Sanjay Raut : शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, दादांच्या विश्वासू आमदारावर गंभीर आरोप; राऊतांचं फडणवीसांना पत्र अन्..
'सुनील शेळके यांच्या मालकीची खाणींची जमीन एमआयडीसीने संपादित केली आहे. शेळकेंची जमीन औद्योगिक वापरासाठी योग्य नसतानाही संपादित करण्यात आली.', असं म्हणत राऊतांनी शेळकेंवर आरोप करत फडणवीसांना पत्र लिहिलं आहे.
सुनील शेळके यांनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. अजित पवार यांचे विश्वासू आमदार म्हणून सुनील शेळकेंची ओळख आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील लिहिलं आहे. देवेंद्र जी महाराष्ट्रातील लूटमार थांबवा, असा उल्लेख संजय राऊत यांनी या पत्रात केला. यासह सुनील शेळकेंनी शासनाची परवानगी न घेता दगड खाणींचे उत्खनन केलेलं आहे. त्याबाबत शेळकेंनी कोणतीही रॉयल्टी सरकारकडे भरलेली नाही. दगड खाणींचे उत्खनन केलेल्या या जमिनीत जवळपास १०० फुटांचे खोल खड्डे आहेत. आंबाळे गावातली जमीन एमआयडीसीने औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित केली आहे. जमीन संपादित करताना एमआयडीसीने खाणींच्या जमिनी वगळल्या आहेत, असे सुनील शेळके यांच्यावर आरोप केलेत. या आरोपाविषयी तसेच शेळके यांच्यावर कारवाई करण्यासाठी राऊतांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

