Dhananjay Deshmukh : ‘ते माझे साडू, पण या प्रकरणात आम्ही..’, धनंजय देशमुखांचं सातपुतेंना सडेतोड उत्तर
Dhananjay Deshmukh On Dadasaheb Khindkar Viral Video : बीड जिल्ह्यात धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकरांचा एक जूना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक देखील झाली आहे. यावर आज धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बीड जिल्ह्यात धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकरांचा एक जूना व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रचंड व्हायरल झाला. त्यात धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब खिंडकर एका व्यक्तीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ जुना असून तो वाद कधीच मिटला असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं असलं तरी खिंडकरांवर घरफोडी, पैसे उकळून फसवणूक अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचेही आता समोर आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आज धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, आम्हाला या प्रकरणाबद्दल माहिती नाही. खिंडकर हे माझे साडू आहेत. त्यांनीही आम्हाला हे माझ्या गावगाड्याचा प्रश्न आहे. यात संतोष देशमुख प्रकरणाचा संबंध नाही, आणि तो लावू नये, असं सांगितलं आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर दादासाहेब स्वत: पोलिसात हजर झालेले आहेत. मात्र त्यानंतर उबाठाचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते यांनी खिंडकर यांच्यावर आरोप करत या संपूर्ण प्रकरणात संतोष देशमुख यांचं नाव घेतलं, हे चुकीचं आहे. आज सगळे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी लढत आहे. तुमच्या गावातले प्रश्न आणि भांडण तुम्ही वेगळ ठेवा, यांच्या लढाईत या गोष्टी आणू नका, त्यांनी काल माझ्या कुटुंबाबद्दल केलेल्या वक्तव्याचा मी निषेध करतो, असंही त्यांनी म्हंटलं.

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल

'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?

एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका

विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
