12th Result 2025 : ‘पाठीवर थाप मारायला आज ते नाही..’, निकालापूर्वी वडिलांच्या आठवणीने वैभवी भावुक
Vaibhavi Deshmukh 12th Result : राज्याचा बारावीचा निकाल आज जाहीर होत आहे. या निकलापूर्वी संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आपल्या वडिलांच्या आठवणीने भावुक झाली.
महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजेनंतर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आहे. यावेळी वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झालेली बघायला मिळाली.
बारावीच्या परीक्षेच्या काळातच संतोष देशमुख यांची हत्या झालेली असल्याने त्यावेळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याच परिस्थितीत वैभवीने 12वी ची परीक्षा दिली होती. आज निकाल असल्याने वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झाली. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाही, याचं दु:ख होतं, असं यावेळी वैभवी म्हणाली. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच लागेल अशी भावना देखील यावेळी तीने व्यक्त केली.

