‘मनोज जरांगे यांची सगळी वक्तव्यं…,’ काय म्हणाले शंभूराज देसाई

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांचा जनाधार हळूहळू कमी होत चालला असल्याचा दावा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. जरांगे यांनी काल कहर करीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सनसनाटी आरोप केले आहेत. त्यानंतर काल उपमुख्यमंत्री आणि मुख्यमत्र्यांनी त्यांच्यावर कारवाईचा इशारा दिला आहे.

'मनोज जरांगे यांची सगळी वक्तव्यं...,' काय म्हणाले शंभूराज देसाई
| Updated on: Feb 26, 2024 | 4:48 PM

मुंबई | 26 फेब्रुवारी 2024 : सुरुवातीला जरांगे यांनी मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यातील पूर्वजांच्या कुणबी नोंदी प्रमाणे प्रमाणपत्राची मागणी केली, सरकारने ती मागणी पूर्ण केली. परत त्यांनी हे सर्व महाराष्ट्रात लागू करा असे म्हणाले. तीही मागणी पूर्ण केली. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी जस्टीस शिंदे समिती नेमली. समितीने अहवाल दिला. एक लाख कर्मचारी नेमून मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण पूर्ण करुन मराठी समाज आर्थिक मागास असल्याचा डाटा जमवला आणि कोर्टात टीकणारे कॉंक्रीट आरक्षण दिल्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले. परंतू त्यांनी सतत भूमिका बदलली. काल त्यांनी कहर करीत फडणवीसांना अरेतुरेची भाषा केली. त्यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे. काल ते म्हटले मी सागर बंगल्याकडे चाललो, नंतर पुन्हा माघारी परतले. सरकारने आता कठोर निर्णय घेतला. त्यांची सगळी वक्तव्ये तपासली जातील कायदा आणि पोलिस आपले काम करेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. जे द्यायचे होते ते दिले आहे आणि काही मागण्या असतील त्यावरही विचार केला जाईल असे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.