शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ‘हे’ आहेत संभाव्य उमेदवार, जयंत पाटील उद्या यादी करणार जाहीर
शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी चार वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उमेदवारांची यादी मुंबईतील पक्ष कार्यालयात जाहीर करणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार देखील समोर आले आहेत.
ठाकरे गट, शिंदे गट आणि भाजपकडून लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आता शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. उद्या दुपारी चार वाजता जाहीर करण्यात येणार आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ही उमेदवारांची यादी मुंबईतील पक्ष कार्यालयात जाहीर करणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार देखील समोर आले आहेत. बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, माढामधून धैर्यशील मोहिते-पाटील, अहमदनगर दक्षिणमधून निलेश लंके, दिंडोरीतून भास्कर भगरे, वर्धामधून अमर काळे, बीड येथून बजरंग सोनवणे, रावेर येथून रवींद्र भैय्या पाटील, भिवंडी येथून बाळ्या मामा म्हात्रे हे उमेदवार लोकसभा निवडणूक लढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बघा व्हिडीओ….
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

