Breaking | नितीन गडकरी-शरद पवार भेट, मोदींच्या सूचनेनुसार ‘सिक्रेट बैठक!’
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरींची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच गडकरी पवारांना भेटल्याचं सांगितलं जातं.
एकीकडे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजकीय गाठीभेटीने चर्चेला उधाण आलेलं असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरींची भेट झाल्याचं वृत्त आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसारच गडकरी पवारांना भेटल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे राजधानी दिल्लीत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. (union minister nitin gadkari meets ncp leader sharad pawar)
पेगासस हेरगिरी प्रकरणावरून विरोधक आक्रमक आहेत. त्यामुळे संसदेचं कामकाजात व्यत्यय येत आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत येऊन सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. त्यामुळे दिल्लीतील राजकीय घडामोडींवर तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच दोन दिवसांपूर्वी शरद पवार आणि नितीन गडकरींची भेट झाल्याचं वृत्त आहे. पवारांच्या निवासस्थानीच ही भेट झाली. शिवाय मोदींच्या सांगण्यावरून ही भेट झाल्याचं सांगण्यात येतं, त्यामुळे गडकरी मोदींचा कोणता निरोप घेऊन पवारांना भेटले याविषयीचेही तर्क लढवले जात आहेत.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

