महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत…

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं घडणार? शरद पवार आणि पार्थ पवार भेटीनंतर भलत्याच चर्चांना उधाण, 3 तासांच्या बैठकीत…

| Updated on: Aug 20, 2026 | 12:39 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक चर्चांना उधाण आले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक चर्चांना उधाण आले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे. मुंबईतील त्यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी झालेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी तब्बल तीन तास चर्चा केली. ही बैठक रात्री सव्वा आठ वाजता सुरू झाली आणि रात्री सव्वा अकरा वाजेपर्यंत चालली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, सध्या सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य विलिनीकरणाच्या आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या भेटीला अत्यंत महत्त्व दिले जात आहे. या बैठकीतील तपशील इतर कोणत्याही नेत्याला ज्ञात नसल्याचेही समोर आले आहे. पुढील काळात या बैठकीचे राजकीय पडसाद उमटतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Published on: Aug 20, 2026 12:39 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us