Sharad Pawar : प्रवाशांवर खापर फोडून चालणार नाही; लोकल अपघातावर शरद पवारांचं ट्विट
Sharad Pawar Tweet On Local Accident : शरद पवार यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली.
आज दिवा – मुंब्रा स्थानकादरम्यान झालेल्या लोकल ट्रेनच्या अपघातात 8 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक लोक यात जखमी आहेत. या घटनेने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. संपूर्ण राज्यातून या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये शरद पवार यांनी म्हंटलं आहे की, ट्रेनमधून पडून प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूची ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सर्व निष्पाप प्रवाशांना श्रद्धांजली अर्पण करतो. मध्यरेल्वेवर दररोज सरासरी 6 ते 7 प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. ही माहिती अत्यंत चिंताजनक आहे. लोकलमधील वाढती गर्दी हे याचं मुख्य कारण आहे. अशा घटना घडल्यावर प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचं खापर फोडून चालणार नाही. वेळेचं उत्तम नियोजन करून लोकल रेल्वेच्या फेऱ्या वाढवणं गरजेचं आहे, असंही त्यांनी या ट्विटमध्ये म्हंटलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

