Nilesh Rane Raid : निलेश राणे यांची थेट भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड अन्.. स्थानिक निवडणुकीपूर्वी मालवणमध्ये पैशांचा खेळ!
शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील एका भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड टाकली. स्थानिक नगरपालिका निवडणुकीत पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप करत, राणेंनी २५ लाख रुपये जप्त केल्याचे सांगितले. त्यांनी एफआयआरची मागणी केली असून, या प्रकारात भाजप नेते रवींद्र चव्हाण यांचे नावही घेतले. संबंधित कार्यकर्त्यांनी मात्र हे आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालवणमध्ये मोठ्या राजकीय खळबळीला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमधील एका भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकला आहे. या कारवाईदरम्यान एका बॅगेत तब्बल २५ लाख रुपये रोख रक्कम आढळल्याचा दावा निलेश राणे यांनी केला आहे. आमदार निलेश राणे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे ही कारवाई जनतेसमोर आणली. मालवण नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
राणे यांच्या मते, भाजप नेते रवींद्र चव्हाण यांच्या मालवण दौऱ्यानंतरच अशा प्रकारची नाटकं सुरू झाली आहेत. “निवडणुका निष्पक्ष पद्धतीने झाल्या पाहिजेत. ही कोणती पद्धत आहे?” असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. केवळ एकच बॅग नसून, घरात अजून तीन ते चार बॅगांमध्ये पैसे असण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. निलेश राणे यांनी तात्काळ कारवाईची मागणी करत, केवळ पैशांची जप्ती नको, तर संबंधित व्यक्तींवर तातडीने एफआयआर नोंदवावा अशी मागणी केली.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

