‘म्हणून उद्धव ठाकरे यांना खाली खेचलं आणि शिवसैनिकाला त्या खुर्चीवर बसवलं’, शिवसेना नेत्याचा घणाघात

‘म्हणून उद्धव ठाकरे यांना खाली खेचलं आणि शिवसैनिकाला त्या खुर्चीवर बसवलं’, शिवसेना नेत्याचा घणाघात

Harshada Shinkar | Updated on: May 07, 2023 | 7:44 AM

VIDEO | हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी कर्नाटकात सभा घ्यावी, शिवसेनेच्या नेत्याचं आव्हान

रत्नागिरी : महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली यावेळी त्यांनी विरोधकांवर चांगलाच निशाणा साधला. आज जे फटाके वाजताय ते तुमच्या बुडाखाली वाजतील असे म्हणत तुम्ही एका शिवसैनिकांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली काढलंय, असा आरोपही केला. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पर्यंत शिवसेना प्रमुखांचे विचार किती पोचले याची मला कल्पना नाही, आम्ही ज्या शिवसेनाप्रमुखाला बघितले आणि आम्ही त्यांच्यासोबत 38 वर्ष काम केली त्यावेळेस शिवसेनाप्रमुख म्हणायचे की, माझ्या सामान्य शिवसैनिकाला मी मुख्यमंत्री करेल.उद्धव ठाकरे कधी शिवसैनिक नव्हते आम्ही ज्या वेळेस फिरायचो आणि शिवसेनेचे काम करत होतो त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांचे एकच स्वप्न होतं की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं. परंतु इथे झाले उलटेच इथे पुत्र मुख्यमंत्री बनला आणि पुत्राचा पुत्रही मंत्री बनला हे महाराष्ट्र आणि शिवसेनाप्रमुखांनी हे स्वप्न कधी पाहिलं नव्हतं. शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला मुख्यमंत्री पदावर बसला नव्हता म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना खाली खेचले आणि शिवसैनिकाला त्या खुर्चीवर बसवले.

तर आमच्या कितीही पिढ्या गेल्या तरी बारसू प्रकल्प होऊ देणार नाही असे म्हणत मुख्यमंत्री फक्त दिल्ली वाऱ्या करतात असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावर संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी महाडच्या सभेमध्ये आज जे स्टेटमेंट केले आहे, त्याच्यावर त्यांनी ठाम राहावे एवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्री दिल्ली वाऱ्या किंवा विदेश वाऱ्या करत आहेत ते महाराष्ट्राच्या भल्यासाठी करत आहेत, असल्याचे म्हणत शिरसाट यांनी त्यांना खोचक टोला लगावला.

Published on: May 07, 2023 7:44 AM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us