Sanjay Raut Full Press | आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊत म्हणाले अधिकृत निर्णय नाही, पण स्वागतच
शिवसेना ठाकरे गटात नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्षपद देण्याच्या शक्यतेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे निर्णय पक्षांतर्गत पातळीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात.
शिवसेना ठाकरे गटात नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांदरम्यान आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्षपद देण्याच्या शक्यतेवर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा प्रकारचे निर्णय पक्षांतर्गत पातळीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. “मला ही माहिती माध्यमांमधूनच समजली आहे. अजून पक्षात असा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही. मात्र, जर आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे येत असेल, तर त्याचे स्वागतच केले पाहिजे,” असे संजय राऊत यांनी म्हटले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, काळानुसार तरुण नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे. “पुढचं राजकारण तरुणांच्या हाती गेलं पाहिजे, त्यामुळे अशा निर्णयांचा विचार करताना त्या दृष्टीने पाहणे गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, काही खासदारांकडून खाजगीत आदित्य ठाकरे राज्यभर फिरत नसल्याची चर्चा होत असल्याच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली. “खाजगी बोलण्याला काही अर्थ नसतो. पक्षाच्या संघटनेबाबत अशा गोष्टींवर नेहमीच चर्चा होत असते,” असे त्यांनी सांगितले. तसेच, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे आणि त्यांच्या तरुण टीमने चांगले काम केल्याचेही संजय राऊत यांनी नमूद केले.
आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊत म्हणाले अधिकृत निर्णय नाही
महिला आरक्षणावर ठाकरेंची शिवसेना ठाम; मिस कॉलवर राऊतांचे प्रत्युत्तर
प्रतिभा चाकणकरांची चौकशी, रुपाली चाकणकरांना नोटीस का नाही?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?

