Aaditya Thackera : एकनाथ शिंदेंना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली, आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट
धनुष्य बाण हे चिन्ह आपल्याकडेच राहणार. शिवसेनेवरचे प्रेम आपलेच राहणार असे म्हणत आदित्य ठाकरेंनी यांनी एकनाथ शिंदेनी स्थापन केलेल्या नविन गटाच्या वैधतेबाबतही भाष्य केले आहे. शिवसेनेने आज पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेले दमदार भाषण चांगलेच चर्चेत आले आहे.
मुंबई : ‘20 मे रोजी एकनाथ शिंदेंना शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती. तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? असे स्वत: पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी विचारले होते,’ असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. एकनाथ शिंदेचे बंड मोडून तोडून टाकण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह युवा नेते आदित्य ठाकरेही मैदानात उतरले आहेत. हिंमत असेल तर तुमच्या बापाचे नाव वापरा असे म्हणत उद्धव ठाकरेंनी(uddhav thackeray) शनिवारी एकनाथ शिंदेचा(Eknath Shinde) बाप काढला होता. यानंतर आता आदित्य ठाकरेंनी तर हे बंड मोडित काढण्याची प्रतिज्ञाच केली आहे. शिवसेनेने आज पुन्हा एकदा मुंबईत शक्ती प्रदर्शन केले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी केलेले दमदार भाषण चांगलेच चर्चेत आले आहे.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

