थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?

थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?

| Updated on: Sep 15, 2026 | 5:43 PM

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीदरम्यान, शिंदे गटाने ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, 2018 च्या घटनेनुसार हे पद चुकीचे असून, बाळासाहेबांच्या निधनानंतर ते गोठवले गेले होते. तसेच, निवडणूक आयोगाला पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचे अधिकार असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, शिंदे गटाने ठाकरे गटाच्या पक्षप्रमुख पदावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल यांनी युक्तिवाद केला की, 2018 च्या पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुख हे पद चुकीचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर 2013 मध्ये हे पद गोठवण्यात आले होते आणि ठाकरे गटाने पक्षाची नवीन घटना निवडणूक आयोगात सादर केलेली नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. नीरज कौल यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, पक्षाचे स्ट्रक्चर आणि नवीन प्रतिनिधींची माहिती निवडणूक आयोगाला दिली गेलेली नाही.

निवडणूक आयोगाला कलम 324 अंतर्गत पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा आणि पक्षाच्या घटनेत लोकशाही व्यवस्था असावी हे सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे. निवडणुकीपूर्वीची वैचारिक युती बदलून निवडणुकीनंतर दुसऱ्या पक्षासोबत सरकार स्थापन केल्याने पक्षात दोन गट पडले आणि कार्यकर्त्यांना अपमानजनक प्रश्नांना सामोरे जावे लागले, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी दुपारी दोन वाजता होणार आहे.

Published on: Sep 15, 2026 5:42 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us