Siya-ketan Case Update | कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने… अखेर मोबाईल डाटा रिकव्हर झालाच

Siya-ketan Case Update | कोणचा विश्वासच बसे ना! 4 महिन्यांपूर्वीच सियाने… अखेर मोबाईल डाटा रिकव्हर झालाच

| Updated on: Jul 07, 2026 | 1:41 PM

पुण्यातील केतन अग्रवाल प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर येत असून तपासात नवे खुलासे होत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील चेतन आणि सिया यांनी तब्बल 4 महिन्यांपूर्वी गुपचूप लग्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी कुटुंबातील कोणालाही याबाबत माहिती दिली नव्हती.

पुणे ग्रामीण पोलिसांनी दोघांचे मोबाईल जप्त करून त्यातील डाटा रिकव्हर केला. या तपासात व्हॉट्सअॅप चॅटमधून अनेक महत्त्वाचे पुरावे समोर आल्याची माहिती आहे. यामध्ये चेतन आणि सिया यांनी लग्न केल्याचे संकेत मिळाल्याचं सांगितलं जात आहे.

तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची योजना आखताना दोघांनी काही गुन्हेगारी वेबसिरीज आणि चित्रपट पाहिल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे. या माध्यमातून गुन्हा करण्याच्या पद्धतींबाबत त्यांनी माहिती घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Published on: Jul 07, 2026 1:41 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us