राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय… अखेर हिंदी सक्तीचे जीआर रद्द
कॅबिनेटची मिटिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं. तसेच डॉ. नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली असून या समितीच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मोठी घोषणा केली आहे. हिंदी भाषा सक्तीचे दोन्ही जीआर रद्द करण्यात येत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ठाकरे बंधूंचा हिंदी भाषेला विरोध आहे. भारतीय भाषेला विरोध आहे. पण इंग्रजीला विरोध नाही. इंग्रजीला रेडाकार्पेट आहे. आम्ही डॉ. नरेंद्र जाधव यांची समिती स्थापन करत आहोत. माशेलकर समितीचा रिपोर्ट आणि इतर लोकांचं म्हणणं आहे. त्यावर ही समिती निर्णय घेईल. त्यानंतर आम्ही त्रिभाषा सूत्रावर आम्ही निर्णय घेऊ. या समितीला आम्ही तीन महिन्याचा वेळ दिला आहे. तोपर्यंत त्रिभाषा सूत्राचा निर्णय रद्द करत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

