Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे प्रकरणी राजेंद्र हगवणेंच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतलं
vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवी हगवणेचा छळ करणारे तिचे सासरे राजेंद्र हगवणे हे सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाथी पोलिसांचे पथकं रवाना झालेले आहेत.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात तिचे सासरे राजेंद्र हगवणे यांच्या जवळच्या मित्राला आता पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. सुनील चांदोरे असं या इसमाचं नाव असून गेल्या एक तासापासून सुनील चांदोरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. चांदोरे हे पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आहेत. सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अॅंटी गुंडा सक्वाडने ही कारवाई केलेली आहे.
पुण्यातील राजकीय पार्श्वभूमी असलेले राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने आत्महत्या केल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिस अॅक्शन मोडवर आलेले आहेत. हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला जात असल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी वैष्णवीचा नवरा शशांकसह तिची सासू आणि नणंद सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर फरार आहेत. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासाथी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अॅंटी गुंडा सक्वाडने राजेंद्र हगवणे यांचे मित्र सुनील चांदोरे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं आहे. चांदोरे यांनी हगवणे यांना पळून जाण्यास मदत केली असल्याचा पोलिसांना संशय आहे.