VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 18 April 2022

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 18 April 2022

| Updated on: Apr 18, 2022 | 3:07 PM

मागच्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर हा कलह सुरु झाला. आता यावर राज्यात लवकरच गाईडलाईन्स येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.

मागच्या काही दिवसांपासून राज्यात भोंग्यांवरुन राजकारण सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर भोंगे वाजवण्याचं वक्तव्य केलं. त्यानंतर हा कलह सुरु झाला. आता यावर राज्यात लवकरच गाईडलाईन्स येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदी समोर हनुमान चालिसा लावण्याचे आव्हान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याचा पुनरुच्चार उत्तर सभेतदेखील त्यांनी केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मशिदीसमोर भोंगे लावल्याचं दिसून आलं. त्यानंतर हा वाद अधिकच वाढत गेला. यावर नाशिक जिल्ह्यात भोंगे लावण्यासाठी पूर्व परवानगी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.