Tv9 Marathi Special Report । लाडकी बहीण योजनेतून किती महिला अपात्र?; सुप्रिया सुळेंनी सरकारला पाडलं तोंडघशी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. माध्यमांमध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 80 लाख महिलांना योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगितले जात असताना, प्रत्यक्षात हा आकडा सव्वा कोटींच्या घरात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सुप्रिया सुळे यांनी आरोप केला की, विधानसभा निवडणुकांपूर्वी कोणतीही सखोल पडताळणी न करता अर्ज करणाऱ्या महिलांना सरसकट लाभ देण्यात आला. मात्र निवडणुका संपल्यानंतर लाभार्थ्यांची छाननी सुरू करण्यात आली आणि मोठ्या प्रमाणात महिलांना अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महिलांना लाभ देऊन त्यांची मते मिळवली गेली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
तसेच, इतक्या मोठ्या संख्येने महिला अपात्र असल्याचे सरकारला निवडणुकांनंतरच कसे लक्षात आले, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. लाडकी बहीण योजनेची व्याप्ती टप्प्याटप्प्याने कमी करून अखेर योजना बंद करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, उपलब्ध आकडेवारीनुसार आता सुमारे 1.66 कोटी महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून सरकारकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.