Supriya Sule | घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकरी, सामान्य नागरिक आणि विविध सामाजिक प्रश्नांबाबत सरकारची भूमिका वेदनादायी असल्याचे म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सरकारमध्ये संवेदनशीलतेचा अभाव असल्याचा आरोप करत त्यांनी शेतकरी, सामान्य नागरिक आणि विविध सामाजिक प्रश्नांबाबत सरकारची भूमिका वेदनादायी असल्याचे म्हटले.
माध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “सातत्याने या सरकारकडून असंवेदनशीलपणा दिसून येत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत किंवा समाजातील विविध घटकांच्या समस्या असोत, सरकारकडे प्रचंड सत्ता असूनही लोकांप्रती असलेली संवेदनशीलता संपल्याचे दिसते. सत्तेसाठी पक्ष फोडणे, घरं फोडणे आणि कोणत्याही मार्गाने सत्तेत येणे हेच या सरकारचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला.”
त्या पुढे म्हणाल्या की, “ज्या जनतेच्या पाठिंब्यामुळे हे सरकार सत्तेत आले, त्याच जनतेचा अपमान करण्याचे काम सध्या सुरू आहे. सत्तेत आल्यानंतर लोकांची सेवा करण्याऐवजी सरकारकडून केवळ असंवेदनशील भूमिका घेतली जात असल्याचे दिसते.”
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी भाजपवरही निशाणा साधला. “भाजपचे कोणतेही भाषण किंवा कार्यक्रम काँग्रेसचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होत नाही. जर एखादे सरकार 12 वर्षे सत्तेत राहूनही आजही विरोधकांवर टीका करण्यातच वेळ घालवत असेल, तर ते विरोधकांचे यश मानावे लागेल,” असे त्या म्हणाल्या.
“जर आम्ही 12 वर्षे सत्तेत असतो, तर आम्ही केलेल्या विकासकामांबद्दल बोललो असतो. मात्र, आजही भाजप नेते काँग्रेसवर टीका करण्यात व्यस्त दिसतात. त्यामुळे काँग्रेसचे नाव घेतल्याशिवाय भाजपचा कार्यक्रम पूर्ण होत नाही,” असा टोला देखील सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, त्यांच्या टीकेवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jun 11, 2026 03:45 PM
घरं फोडा, पक्ष फोडा आणि सत्तेत या! भाजप सरकारवर सुळेंचा हल्लाबोल
कुंभार समाजाला सरकारची मोठी भेट! बावनकुळेंची थेट महत्त्वाची घोषणा
मोठी बातमी! लोकसभेची सदस्यसंख्या 824 पर्यंत वाढवणार? सल्लागारांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या

