Sushma Andhare : छोटं पोर… नितेश बेटा आनंद घेत रहा, सुषमा अंधारेंनी राणेंना डिवचलं
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंचा आज विजयी मेळावा होत आहेत. यानिमित्ताने राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य शिवसैनिक वरळी डोम येथे दाखल झालेत.
भाजपचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी शनिवारी उद्धव आणि राज ठाकरे यांच्या विजयी मेळाव्याला जिहादी रॅली असल्याचे म्हटले. ठाकरेंचा विजयी मेळावा ही हिंदूविरोधी रॅली आहे, ही जिहादी रॅली आहे. याचा मराठी अस्मितेशी काहीही संबंध नाही, अशी टीका नितेश राणेंनी यांनी केली होती. या टीकेवर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी नितेश राणेंना उपरोधिक टोला लगावला आहे.
आज मुंबईत वरळी डोम येथे ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा एकत्रित पार पडतोय. या मेळाव्याला सुषमा अंधारे यांनीही हजेरी लावली. यावेळी बोलताना अंधारे म्हणाल्या, इतक्या मोठ्या आनंदाच्या क्षणी आपण छोट्या पोरांचं बोलणं मनावर घ्यायचं नसतं, वाईट वाटून घ्यायचं नसतं. ती लहान पोरं आहेत. नितेश बेटा आनंद घेत राहा, असा उपरोधिक टोला लगावत सुषमा अंधारेंनी त्यांनी डिवचल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यापेक्षा माझा पोलिसांनी एन्काऊंटर करावा, ज्ञानेश्वरी मुंडे संतापल्या

मनसेवर तुटून पडणारे आता कुठे लपलेत? राज ठाकरेंचा आक्रमक सवाल

...तर BJP 150 जागाही जिंकणार नाही, मोदींचं नाव घेत दुबेंचा मोठा दावा

विधीमंडळातील राड्यानंतर कठोर नियम, या व्यक्तींना विधानभवनात नो एन्ट्री
