देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?
राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणावरून ठाकरे गट पुन्हा आक्रमक झाला आहे. या प्रकरणात याआधीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने रामरक्षा आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांकडून धार्मिक गीतांचे आणि रामरक्षेचे पठण करण्यात आले होते. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती. याविषयी आता उबाठा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.

संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली, यावेळी त्यांनी अनेक विषयांवर प्रकाश टाकला. त्यात त्यांनी नागपूरमधील रामरक्षा आंदोलनाबाबत भाष्य केले. नागपूरमधील ज्या राममंदिरात ठाकरे गट आंदोलनाची तयारी करत आहेत, त्या मंदिरातील न्यासाचे (ट्रस्ट) अध्यक्ष देवेंद्र फडणवीस असल्याचं सांगितलं जात आहे. मंदिरात राजकीय पठणाला किंवा राजकीय नेत्यांचे कोणतेही आंदोलन करता येणार नाही, असं मंदिर ट्रस्टने सांगितल्याच्या चर्चा आहेत. याविषयी बोलताना राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस जर अध्यक्ष असतील तर त्यांनीही आम्हाला पाठिंबा द्यावा. कारण ते रामाचे आजीवन भक्त आहेत आणि आम्हीदेखील भक्त आहोत.” त्यांच्या या वक्तव्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
यापूर्वी दादरमध्येही ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. राम मंदिर दान प्रकरणातील कथित गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.