‘कुठलं थोबाड, कुठलं सौंदर्य दाखवलं होतं?’ ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाट यांच्या त्या वक्तव्यावर घणाघात
संजय शिरसाट यांनी मोठा दावा करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिरसाट यांनी, एकदा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांचं सौदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली असा दावा केला होता. त्यावर आदित्य ठाकरे उत्तर दिलं होतं.
मुंबई, 31 जुलै 2023 | ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात जाऊन तेथे उत्तर भारतीयांचा मेळावा घेतला. त्यावेळी राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी भाषण केलं होतं. त्यावरून शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठा दावा करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिरसाट यांनी, एकदा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले होते की, आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदी यांचं सौदर्य पाहून त्यांना राज्यसभेची खासदारकी दिली असा दावा केला होता. त्यावर आदित्य ठाकरे उत्तर दिलं होतं. तर प्रियंका चतुर्वेदी यांनी ट्विट करत शिरसाट यांना प्रत्युत्तर दिलं. मी कशी दिसते आणि मी जिथे आहे तिथे का आहे हे मला एका गद्दार व्यक्तीने सांगायची गरज नाही असा घणाघात त्यांनी केला. त्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांनी देखील संजय शिरसाठ यांच्यावर टीका केलीय. शिरसाट यांची औकात नसताना शिरसाठ यांचं कुठलं थोबाड बघून तुम्हाला तिकीट दिलं….तुम्ही कुठलं सौंदर्य दाखवलं होतं हे पण जनतेला सांगा अशी टीका केली आहे. तर जेव्हा लोकांकडे मत मागायला जाल तेव्हा लोक तुम्हाला पायतनान आणि मारल्याशिवाय राहणार नाही असाही टोला लगावला आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

