Thane | मुंबईनंतर आता ठाण्यात तरंगते हॉटेल, गायमुख खाडीवर तरंगत्या हॉटेलची संकल्पना
महाराष्ट्र पर्यटन विभागाने सुरू केलेल्या बोटीवरील तरंगत्या हॉटेलची मेजवानी पर्यटकांना ठाण्यातदेखील अनुभवता येणार आहे.

thane floating hotel
ठाणे : महाराष्ट्र पर्यटन विभागाने सुरू केलेल्या बोटीवरील तरंगत्या हॉटेलची मेजवानी पर्यटकांना ठाण्यातदेखील अनुभवता येणार आहे. सोमवारपासून या प्रकल्पाला सुरुवात होणार असून ठाण्याच्या गायमुख खाडीजवळ हे तरंगते हॉटेल सुरू होणार आहे. सध्या कोरोनामुळे 50 टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी एक जेट्टी दाखल झाली असून यामध्ये सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांना आता तरंगत्या हॉटेलची मेजवानी अनुभवता येणार आहे. (Thane First floating hotel will start from Monday)
