मग सर्वात आधी राष्ट्रपती कोविंद यांचा राजीनामा घ्यावा लागेल – संजय राऊत
मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (tipu sultan) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित (raj purohit) यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
मालाडमधील उद्यानाला टिपू सुलतान (tipu sultan) यांचे नाव देण्यात आले आहे. त्यावरून वाद सुरू आहेत. भाजपने या नामकरणाला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित (raj purohit) यांनी तर या प्रकरणी पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. भाजपच्या या मागणीचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार समाचार घेतला आहे. टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा. मुंबईत काय करायचं हे मुंबई महापालिका आणि राज्य सरकार पाहून घेईल. तुम्ही काळजी करू नका.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

