Nanded News : वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान
Unseasonal Rain : नांदेडमध्ये अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
नांदेडमध्ये आलेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणाने राज्यात पिकांवर परिणाम होत होता. त्यातच पावसाला देखील सुरुवात झाल्याने यामुळे उन्हाळ पिकांना फटका बसला आहे. मुसळधार पावसाने शेतात पाणी साचलं असल्याने यामुळे नांदेडमध्ये टोमॅटो बागांचं नुकसान झालं आहे. काढणीला आलेले टोमॅटो पावसाच्या तडाख्याने सडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. अवकाळी पावसामुळे टोमॅटो बागांना चांगलाच फटका बसला आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पूर्ण शेतात पाणी झाल्याने शेतकऱ्यांवर टमाट्याची झाडं उपटून फेकण्याची वेळ आलेली आहे. एकीकडे सरकार कर्जमाफी देत नाही, तर दुसरीकडे पावसाचा कहर, यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

