Uday Samant : दोन नेत्यांना भेटण्याचा अधिकार लोकशाहीत आहे..; ठाकरे-फडणवीस भेटीवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis - Raj Thackeray Meeting : मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे,
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील हॉटेल ताज लँड एन्डमध्ये हे दोन्ही नेते एकत्र आलेले आहेत. या भेटीचं कारण अद्याप समजलेलं नसलं तरी दोन्ही नेते एकाच ठिकाणी येणं हा योगायोग आहे की त्यांच्यात भेट झाली आहे याबद्दल अजून स्पष्ट समजलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हॉटेलमध्ये पोहोचण्याच्या अर्धातास आधी राज ठाकरे याठिकाणी दाखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री येथे आले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर मंत्री उदय सामंत यांना विचारणा केली असता, लोकशाहीत या दोन्ही नेत्यांना एकमेकांना भेटण्याचा अधिकार आहे. मात्र फडणवीस याठिकाणी कार्यक्रमासाठी गेले होते की अजून काही कामासाठी याबद्दल मला कल्पना नाही. किंवा या दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे अशी कोणतीही माहिती मला तरी नाही आणि तशी माहिती असण्याचं कारण देखील नाही, असं सामंत यांनी म्हंटलं आहे.
Published on: Jun 12, 2025 11:39 AM
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
