Shivsena : कम ऑन किल मी vs मरे हुए को क्या मारना… ठाकरे-शिंदे यांच्यात घमासान, अॅम्ब्युलन्स, मुडदा अन्…
ठाकरे ब्रँडवरून उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये वार पलटवार रंगले. बोल बच्चनवर बोलणार नाही, ठाकरेंच्या प्रश्नावर फडणवीसांनी असं उत्तर दिलं. तर ठाकरे ब्रँड पुसून टाकाल तर भाजपचं नामोनिशाण मिटवून टाकू असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटलंय. तर बोल बच्चन लोकांना काय उत्तर देणार असं प्रतित्त्युर फडणवीसांनी दिलं.
शिवसेनेचा काल ५९ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम येथे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे षण्मुखानंद येथे साजरा करत दोघांनी एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप केलेत. उद्धव ठाकरे म्हणाले, ‘एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा? नाना पाटेकर किती जणांनी पाहिला आहे? त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी तसा मी या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतो त्यांना मी कम ऑन किल मी.. असेल हिंमत तरी या अंगावर… फक्त अंगावर येणार असेल तर एक गोष्ट नक्की करा. आमिताभ बच्चनचा एक पिक्चर होता ना अँबुलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँबुलन्स घेऊन या. कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल.’ असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणातून शिंदेंवर हल्लाबोल केला.
तर एकनाथ शिंदे यांनीही वरळी डोम येथील मेळाव्यातून पलटवार केला. शिंदे म्हणाले, ठाकरे मेळाव्यातून म्हणाले, कम ऑन किल अरे…मरे हुए को क्या मारना है… महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुडदा पाडलेलाच आहे. अँबुलन्स मधून परत जाल म्हणे तुम्हाला आम्ही फटके देऊ तुम्ही परत जा… पण नुसताच शोर करून मनगटात जोर येत नाही.. हे लक्षात ठेवा… वाघाचं कातडं पांघरून लाँडगा वाघ होत नाही.

भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, येमेनमधील उद्याची फाशी टळली

मुंबईत मुसळधार, अंधेरी सबवे पाण्याखाली; वाहतूक कोंडी

अरे आमची लाज काढू नका... भर सभागृहात शंभूराज देसाई संतापले अन्...

तुमच्यापेक्षा जास्त बोलता येत; सरकारची लाज काढली, गुलाबराव पाटील भडकले
