⁠Budget 2026 Announcement : लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार महिलांसाठी ‘SHE-MART’ तयार करणार

⁠Budget 2026 Announcement : लाडक्या बहिणींना खुशखबर! सरकार महिलांसाठी ‘SHE-MART’ तयार करणार

| Updated on: Feb 01, 2026 | 12:23 PM

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये ग्रामीण महिलांसाठी SHE-MART ची घोषणा केली. यासह एमएसएमई, बायोफार्मा, सेमीकंडक्टर क्षेत्रांसाठी हजारो कोटींची तरतूद केली आहे. शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरणावर भर देत, त्यांनी विविध विकास योजना आणि प्रकल्पांचे अनावरण केले.

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ग्रामीण महिलांसाठी SHE-MART ची विशेष घोषणा केली. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षमीकरणामध्ये मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. अर्थमंत्र्यांनी विविध क्षेत्रांसाठी महत्त्वाच्या तरतुदी जाहीर केल्या. सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठी (MSME) 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 5 वर्षांत 20 नवे राष्ट्रीय जलमार्ग तयार करणे, 7 हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणे (ज्यात मुंबई ते पुणे आणि पुणे ते हैदराबाद कॉरिडॉरचा समावेश आहे), तसेच कंटेनर निर्मितीसाठी 10 हजार कोटींची तरतूद यांसारख्या योजनांचा समावेश आहे. शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी पाच विद्यापीठ टाउनशिप आणि 15 हजार शाळांमध्ये कँडेट क्रिएटर लॅब उभारल्या जातील. आरोग्य क्षेत्रात कॅन्सर आणि मधुमेहाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा करण्यात आली असून, 3 नवे आयुर्वेद एम्स (AIIMS) तयार केले जाणार आहेत. पर्यावरणपूरक मालवाहतुकीसाठी कॉरिडॉर उभे करणे आणि बायोफार्मासाठी 10 हजार कोटींची तरतूद करून भारताला या उत्पादनाचे केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

Published on: Feb 01, 2026 12:23 PM