India – Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. हा तणाव शांत करण्यासाठी आता यूएनकडून मध्यस्थी करण्यात आल्याचं समजतं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जेशनकर यांच्याशी त्यांनी चर्चा केलेली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करत यूएनने संघर्ष टाळण्याचं आवाहन केलेलं आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासचिवांनी दोन्ही देशांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केलेली आहे. भारत पाकिस्तानने संघर्ष टाळावा असं मत संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केलं आहे. तर हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी भूमिका भारताने देखील घेतलेली असल्याचं समजत आहे.
Published on: Apr 30, 2025 09:11 AM
Latest Videos

मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या

ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला

गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर

शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
