CM Shinde : मुख्यमंत्र्याचा नुकसानग्रस्त भागाचा दौरा म्हणजे वांझोट्या भेटी; शिवसेना नेत्याची शिंदेवर खरमरित टीका
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांची जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार अवकाळी आणि गारपीट झाली आहे. त्यामुळे नाशिक, अहमदनगर, जळगाव, धाराशिव भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांची जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. दावने यांनी, अधिवेशन काळातच मदत जाहीर केली असून ती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्याच्या नुसत्या वांझोट्या भेटी आहेत. मुख्यमंत्र्यांनी वांझोट्या भेटी करण्याच्या ऐवजी मदत आणि घोषणा करत शेतकऱ्यांना ताबडतोब दिलासा देण्याची गरज आहे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

