Unseasonal Rain | शेतकऱ्याच्या पदरात पुन्हा निराशाच… अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हाताशी आलेलं पीक उद्ध्वस्त
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या खांद्यापर्यंत आलेले पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या खांद्यापर्यंत आलेले पीक अक्षरशः जमीनदोस्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. विशेष म्हणजे अमरावतीत अलीकडेच झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी खूप मेहनतीने, मन लावून, कष्ट करून पिकं वाढवली, पण ऐनवेळी पिकं मोठी झाल्यावर आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात पुन्हा निराशा पडली आहे.
अमरावतीतील शेतकऱ्यांनी केळीचं पीक घेतलं होतं. हे पीक अगदी हाताशी आलं असताना उद्ध्वस्त झालं. स्थानिक शेतकऱ्यांच्या सांगितल्यानुसार, एकाच पावसात त्यांचं चार ते पाच लाखांचं नुकसान झालं आहे. गारपिटी नंतर उरलेल्या पिकांमधून मद्दल रक्कमही निघणार नाही. यावेळी शेतकरी लवकरात लवकर मदत मिळावी अशी मागणी करत आहेत.
Published on: May 09, 2026 12:46 PM
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi

