Vaishnavi Hagawane Case : अटकेनंतरही राजेंद्र हगवणेंचा उद्दामपणा… सुनेच्या आत्महत्येचा पश्चात्ताप नाहीच? पत्रकारांचा सवाल अन्…
राजेंद्र हगवणे यांना अटक करण्यापूर्वीचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. समोर आलेल्या सीसीटीव्हीच्या दृश्यामध्ये राजेंद्र हगवणे हा मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये बसल्याचे दिसतेय.
वैष्णवी मृत्यू प्रकरणी अटकेनंतरही राजेंद्र हगवणे याचा उद्दामपणा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सुनेच्या आत्महत्येनंतर पश्चात्ताप होता का? असा सवाल माध्यमांच्या काही प्रतिनिधींनी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना केला असता धक्कादायक प्रतिक्रिया समोर आली. पत्रकारांकडून करण्यात आलेल्या या प्रश्नावर राजेंद्र हगवणे याने नकारार्थी मान हलवल्याचे पाहायला मिळाले.
वैष्णवीची संशयास्पद हत्या झाल्यानंतर सात दिवस वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे फरार होते. दरम्यान, यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस त्यांच्या मगावर होते. अशातच पुण्याच्या तळेगावतील एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारताना हे दोघेही पिता-पुत्र सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलीसांनी आरोपींना ट्रॅक केल्याची माहिती मिळतेय. माहितीच्या आधारे राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेला स्वारगेट परिसरातून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दोन्ही आरोपींना पिंपरी- चिंचवड पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये आणले. दोन्ही आरोपींना घेऊन आता पोलीस बाबधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल करत असताना हा सवाल पत्रकारांनी विचारल्याचा अंदाज आहे.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

