Vaishnavi Hagawane : राजेंद्र हगवणेला शिवाजीनगर कोर्टात हजर करणार; सुरक्षा वाढवली
Rajendra Hagawane Arrested : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी तिच्या फरार सासऱ्याला आणि दिराला अटक करण्यात आली आहे. शिवाजीनगर कोर्टात त्यांना थोड्याच वेळात हजर करण्यात येणार आहे.
पुणे शिवाजीनगर कोर्ट परिसरातली सुरक्षा आता पोलिसांनी वाढवली आहे. थोड्याच वेळात राजेंद्र हगवणे आणि त्याच्या मुलाला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. भाजपने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. हुंड्यासाठी छळ केल्याने वैष्णवीने आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणी वैष्णवीच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवीचा सासरा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा माजी पदाधिकारी आहे. 17 मे रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर वैष्णवीचा पती, सासू आणि नंदेला अटक करण्यात आली होती. तर आज फरार झालेल्या राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीच्या दिराला अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता थोड्याच वेळात या हगवणे पिता पुत्राला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं जाणार आहे.