Pune kaspate Family Press : हतबल बापाच्या डोळ्यात भर पत्रकार परिषदेत पाणी, हात जोडून केली विनवणी
Vaishnavi Hagawane : हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर काल कोर्टात केलेल्या युक्तीवादावर आज अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे.
शशांक हगवणेला दिलेल्या दीड लाखांच्या मोबाईलचे हफ्ते आजही मी भरत आहे. लग्नामध्ये फॉर्च्युनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी त्यामुळं वादावादी केली, मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी एमजी हेक्टर पेटवून देईन असं सांगण्यात आलं, म्हणून फॉर्च्युनर दिली, अशी माहिती मृत वैष्णवी हगवणेचे वडील अनिल कस्पटे यांनी दिली आहे. आज पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इतकंच नाही तर निलेश चव्हाण देखील यात सहभागी होता, त्यावेळी तिथं तो ही तिथं होता, असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला आहे.
यावेळी बोलताना अनिल कस्पटे म्हणाले की, वैष्णवीने आत्महत्या करण्याआधी पाच ते सहा दिवस सातत्याने हगवणे कुटुंब तिला मारहाण करत होते. माझ्या मुलीवर आताही आरोप करत आहेत. शिंतोडे उडवत आहेत. माझ्या मुलीवर शिंतोडे उडवू नका. तुम्हाला ही मुली असतील, तुम्ही सर्वांनी हा विचार करा, असं म्हणताना वैष्णवीच्या वडिलांना भर पत्रकार परिषदेत अश्रु अनावर झालेले बघायला मिळाले. दरम्यान, यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी फॉरच्युनरच्या आधी घेतलेल्या एमजी हेक्टर बुकिंगची रिसीट आणि शशांकने घेतलेल्या दीड लाखांच्या मोबाईची पावती देखील दाखवली आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

