AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | नथुराम गोडसे भारतातील पहिला अतिरेकी, जितेंद्र आव्हाड यांनी केला हल्लाबोल

महात्मा गांधी यांची हत्या नथुराम याने केली नाही असा दावा रणजीत सावरकर यांनी त्यांच्या 'मेक शुअर गांधी इज डेड' या पुस्तकात केला आहे. यावरुन वाद निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी असल्याची टीका केली आहे. नथुराम गोडसे यांनी गोळीबार करताना त्या घटनास्थळी काकासाहेब गाडगीळ होते. त्याने त्याला ओळखले होते. नेहरु आणि गांधी यांना बदनाम करायचा कट गेली अनेक वर्षे सुरु आहे आता तो फोफावला आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Video | नथुराम गोडसे भारतातील पहिला अतिरेकी, जितेंद्र आव्हाड यांनी केला हल्लाबोल
| Updated on: Jan 29, 2024 | 7:56 PM
Share

मुंबई | 29 जानेवारी 2024 : रणजीत सावरकर यांनी लिहीलेल्या ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकावरुन वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकांत महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसे याच्या गोळीबाराने झाली नाही असा दावा केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या पुस्तकावर संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी होता असा हल्ला जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी लेखक रणजित सावरकर यांना थोतांड पसरवून राज्यसभेला आपण फिट आहोत हे भासवायचे असेल अशी टीका केली आहे. गांधीजींना मग अदृश्य शक्तीने मारले काय ? उद्या ते असेही म्हणतील गांधीजींचा स्वातंत्र्यलढ्यात सहभागच नव्हता. नेहरु आणि गांधी यांना बदनाम करायचा कट गेली अनेक वर्षे सुरु आहे आता तो फोफावला आहे. लोक हुशार आहेत लोकं मुर्ख नाहीत. याआधीही नथुरामने गांधीजींवर हल्ला केला होता. महाबळेश्वर, पांचगणी येथे कॉंग्रेसच्या अधिवेशनात गांधींवर नथुरामने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या कमळे गुरुजींनी त्याला उचलून आपटले होते. गांधीजी मध्ये पडले म्हणून नथुराम वाचल्याचे आव्हाड यांनी सांगितले. अशा प्रवृत्तींनी पाच वेळा गांधींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता असेही आव्हाड यांनी सांगितले.

Follow Us
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर
राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिक
Mumbai Thane Helpline Number |राज्यात पवासाचं थैमान; हेल्पलाईन नंबर जारी; मुख्यमंत्र्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
Siya Goyal Breaking | केतन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पुन्हा चर्चेत; कॅमेऱ्यासमोर सिया गोयलचा माजोरडेपणा आला समोर
दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय
Tukaram Mundhe | दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही; तुकाराम मुंडेंचा मोठा निर्णय, कोणते आहेत नवे नियम?
राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! खोतांचा घणाघात; महायुतीला सावध...
Sadabhau Khot | राष्ट्रवादी पक्ष नाही, टोळी आहे! सदाभाऊ खोतांचा घणाघात; महायुतीला सावध राहण्याचा इशारा
अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची..
Ram Mandir News | अयोध्या राम मंदिर दानपेटी चोरीवर संघाचे भाष्य! दत्तात्रय होसबळेंची पहिली मोठी प्रतिक्रिया