VIRAL VIDEO: विरारच्या रिसॉर्टमध्ये मोठा राडा! खुर्च्या, दांडे आणि ड्रमने दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
विरारमधील नावापूर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना समोर आली असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विरारमधील नवापूर परिसरातील एका रिसॉर्टमध्ये दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीची घटना समोर आली असून, याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रिसॉर्टमध्ये दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी संबंधितांनी एकमेकांवर लाकडी दांडे, प्लास्टिकच्या खुर्च्या तसेच ड्रमचा वापर करून हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
या मारहाणीत काही जण जखमी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी अधिकृतरीत्या त्याबाबत माहिती समोर आलेली नाही. तसेच या वादामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांकडून व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यात येत असून, घटनेमागील कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आली आहे. तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
