विधानसभेत 11 संजय, 27 पाटील, 7 पवार, 6 शिंदे आमदार!

मुख्यमंत्री कोणीही झालं तरी विधानसभेत पाटलांचा (Similar sirname in Maharashtra Vidhan sabha) बोलबाला आहे. कारण थोडे थोडके नव्हे तर तब्बल 27 आमदार पाटील (Similar sirname in Maharashtra Vidhan sabha) आडनावाचे आहेत.

विधानसभेत 11 संजय, 27 पाटील, 7 पवार, 6 शिंदे आमदार!
Follow us
| Updated on: Oct 28, 2019 | 1:17 PM

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर भाजप-शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरुन चढाओढ सुरु आहे. शिवसेनेने फॉर्म्युल्याची आठवण करुन देत मुख्यमंत्रिपदावर दावा केला आहे. मुख्यमंत्री कोणीही झालं तरी विधानसभेत पाटलांचा (Similar sirname in Maharashtra Vidhan sabha) बोलबाला आहे. कारण थोडे थोडके नव्हे तर तब्बल 27 आमदार पाटील (Similar sirname in Maharashtra Vidhan sabha) आडनावाचे आहेत.

केवळ पाटील आडनावाचे सर्वाधिक आमदार आहेत असं नाही. तर समान आडनावाचे अनेक आमदार आहेत. यंदा 288 पैकी 27 आमदार पाटील आहेत. त्यानंतर 7 आमदार पवार आडनावाचे आहेत. मग त्याखालोखाल 6 शिंदे , 5 नाईक, तर 5 देशमुख आडनावाचे आमदार आहेत. विधानसभेत 5 चव्हाण, 4 जाधव, 3 कदम आणि 3 गायकवाड आडनावाचे आमदार आहेत.

संजय नावाचे 11 आमदार

आडनाव सारखे असणारे अनेक आमदार असताना, दुसरीकडे नामसाधर्म्याचेही अनेक आमदार आहेत. यंदा विधानसभेत संजय नावाचे तब्बल 11 आमदार आहेत. संजय नावाचा पहिला आमदार 1985 मध्ये पहिल्यांदा निवडून आला होता. त्यानंतर संजय नावाच्यांची आमदारांची संख्या 3,5,10 आणि आता 11 अशी वाढत गेली.

26 पाटील आमदार

राष्ट्रवादी

1. दिलीप वळसे पाटील (आंबेगाव) 2. जयंत पाटील (इस्लामपूर) 3. सुमनताई पाटील (तासगाव) 4. अनिल पाटील (अंमळनेर) 5. बाबासाहेब पाटील (अहमदपूर) 6. बाळासाहेब पाटील (कराड उत्तर) 7. राजेश नरसिंग पाटील (चंदगड)

शिवसेना

1. गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण) 2. किशोर पाटील (पाचोरा) 3. चिमणराव पाटील (एरंडोल) 4. राहुल पाटील (परभणी) 5. शहाजी बापू पाटील (सांगोला) 6. कैलास पाटील (उस्मानाबाद)

भाजप

1. चंद्रकांत पाटील (कोथरुड) 2. राधाकृष्ण विखे पाटील (शिर्डी) 3. रवीशेठ पाटील (पेण) 4. राणा जगजितसिंह पाटील (तुळजापूर) 5. संतोष दानवे पाटील (जालना) 6. संभाजी निलंगेकर पाटील (निलंगा)

काँग्रेस

1. ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण) 2. कुणाल पाटील (धुळे) 3. माधवराव पाटील जवळकर (हदगाव) 4. पी एन पाटील सडोलीकर (करवीर)

मनसे

1. राजू (प्रमोद) पाटील (कल्याण ग्रामीण)

बविआ

1. राजेश पाटील (बोईसर)

अपक्ष

1. चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) 2. राजेंद्र पाटील यड्रावकर (शिरोळ)

7 पवार आमदार

  1. राजेश पवार (भाजप)-नायगाव
  2. नितीन पवार (राष्ट्रवादी)-कळवण
  3. अशोक पवार (राष्ट्रवादी)-शिरुर
  4. अजित पवार (राष्ट्रवादी)-बारामती
  5. रोहित पवार (राष्ट्रवादी)-कर्जत जामखेड
  6. लक्ष्मण पवार (भाजप)-गेवराई
  7. अभिमन्यू पवार (भाजप)-औसा

6 शिंदे आमदार

  1. एकनाथ शिंदे (शिवसेना)-कोपरी-पाचपाखाडी
  2. संजय शिंदे (अपक्ष)-करमाळा
  3. बबन शिंदे (राष्ट्रवादी)-माढा
  4. प्रणिती शिंदे (काँग्रेस)-सोलापूर शहर मध्य
  5. श्यामसुंदर शिंदे (अपक्ष)-लोहा
  6. महेश शिंदे (शिवसेना)-कोरेगाव

5 नाईक आमदार

  1. शिरीष नाईक (काँग्रेस)-नवापूर
  2. इंद्रनिल मनोहर नाईक (राष्ट्रवादी)-पुसद
  3. गणेश नाईक (भाजप)-ऐरोली
  4. वैभव नाईक (शिवसेना)-कुडाळ
  5. मानसिंग नाईक (राष्ट्रवादी)-शिराळा

5 देशमुख आमदार

  1. धीरज देशमुख (काँग्रेस)-लातूर ग्रामीण
  2. अमित देशमुख (काँग्रेस)-लातूर शहर
  3. अनिल देशमुख (राष्ट्रवादी)-काटोल
  4. विजयकुमार देशमुख (भाजप)-सोलापूर शहर उत्तर
  5. सुभाष देशमुख (भाजप)-सोलापूर दक्षिण

5 चव्हाण आमदार

  1. मंगेश चव्हाण (भाजप)-चाळीसगाव
  2. अशोक चव्हाण (काँग्रेस)-भोकर
  3. रवींद्र चव्हाण (भाजप)-डोंबिवली
  4. दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)-फलटण
  5. पृथ्वीराज चव्हाण (काँग्रेस)-कराड दक्षिण

4 जाधव आमदार

  1. यामिनी जाधव (शिवसेना)-भायखळा
  2. मकरंद जाधव (राष्ट्रवादी)-वाई
  3. भास्कर जाधव (शिवसेना)-गुहागर
  4. चंद्रकांत जाधव (काँग्रेस)-कोल्हापूर उत्तर

3 गायकवाड आमदार

  1. संजय गायकवाड (शिवसेना)-बुलडाणा
  2. गणपत गायकवाड (भाजप)-कल्याण पूर्व
  3. वर्षा गायकवाड (काँग्रेस)-धारावी

3 कदम आमदार

  1. राम कदम (भाजप)-घाटकोपर पश्चिम
  2. योगेश कदम (शिवसेना)-दापोली
  3. डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)-पलुस कडेगाव

11 संजय विधानसभेत

संजय सावकारे (भाजप)- भुसावळ

संजय गायकवाड (शिवसेना)-बुलडाणा

संजय रायमूलकर (शिवसेना)-मेहकर

संजय कुटे (भाजप)-जळगाव जामोद

संजय राठोड (शिवसेना)-दिग्रस

संजय शिरसाठ (शिवसेना)-औरंगाबाद पश्चिम

संजय केळकर (भाजप)-ठाणे

संजय पोतनीस (शिवसेना)-कलिना

संजय जगताप (काँग्रेस)-पुरंदर

संजय बनसोडे (राष्ट्रवादी)-उदगीर

संजय शिंदे (अपक्ष)-करमाळा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.