पवारसाहेब उभे राहिले तरीही 100 टक्के लढणार : अभिजीत बिचुकले

'बिग बॉस माराठी-2' पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. इतकंच नाही तर साातऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) उभे राहिले, तर त्यांना आव्हान देणार असल्याचंही अभिजीत बिचुकले म्हणाले.

पवारसाहेब उभे राहिले तरीही 100 टक्के लढणार : अभिजीत बिचुकले
Follow us
| Updated on: Sep 25, 2019 | 6:31 PM

पुणे : ‘बिग बॉस माराठी-2’ पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) यांनीही आता विधानसभेची तयारी सुरु केली आहे. इतकंच नाही तर साातऱ्याच्या पोटनिवडणुकीत शरद पवार (Sharad Pawar) उभे राहिले, तर त्यांना आव्हान देणार असल्याचंही अभिजीत बिचुकले म्हणाले. “सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लढणार आणि जर शरद पवारसाहेब उभे राहिले तर 100 लढणार”, असं वक्तव्य अभिजीत बिचुकले यांनी केलं (Abhijit Bichukale and Sharad Pawar).

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारख्या जाहीर झाल्या आहेत (Maharashtra Assembly Elections dates). या विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील 288 पैकी 288 जागा लढवणार असल्याचं कवी मनाचे नेते अभिजीत बिचुकले यांनी सांगितलं. त्याशिवाय त्यांनी स्वत:चा वेगळा पक्षही स्थापन केला. ‘अखिल बहुजन समाज सेना’ या नावाचा पक्ष अभिजीत बिचुकले यांनी स्थापन केला.

उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale join BJP) यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत थेट भाजपात प्रवेश केला. उदयराजे यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून साताऱ्याची जागा लढवली आणि ते जिंकुनही आले. मात्र, आता त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने सातारा लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेतली जाणार आहे (Satara Loksabha Bypoll). या जागेसाठी अभिजीत बिचुकले स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतणार आहेत.

“उदयनराजे शिवरायांच्या घराण्यात जन्माला आलेत, तरी त्यांच्यासमोर लोकशाही पद्धतीने लढलो. तर मग शरद पवारांना का सोडू? पवार साहेब निवडणुकीत उभे राहिले, तर 100 टक्के लढणार. मला लोकसभा लढणे अधिक योग्य वाटते कारण माझं हिंदी आणि इंग्रजी अधिक चांगल आहे”, असं अभिजीत बिचुकले म्हणाले.

कोणतीही निवडणूक नाही, जी साताऱ्याचे कवी मनाचे नेते अभिजित बिचुकलेंनी लढवली नाही. नगरपालिका, विधानसभा, लोकसभा, अशा निवडणुका बिचुकलेंनी आपल्यासह पत्नी अलंकृताराजे बिचुकले यांना सोबत घेऊन लढल्या. 2014 पासून लोकसभेची निवडणूक उदयनराजे भोसले यांच्याविरोधात एकमेव व्यक्ती लढा देतोय तो म्हणजे अभिजित बिचुकले.

अभिजीत बिचुकले ‘बिग बॉस माराठी-2’ मध्ये आपल्या अनोख्या शैलीमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. इतकंच नाही तर अभिनेता सलमान खाननेही त्यांना हिंदी बिग बॉसमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं. त्यामुळे महाराष्ट्रातील आणि साताऱ्यातील जनतेच्या मनात अभिजीत बिचुकलेंनी एक वेगळं स्थान मिळवलं आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत साताऱ्याची जनता बिचुकलेंना मत देणार का हे पाहाणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे.

संबंधित बातम्या :

उदयनराजेंना हरवणार, 288 जागा लढवणार, अभिजित बिचुकलेचा निर्धार

अभिजीत बिचकुलेचं नाव घेऊ नका, मला अटक होईल : उदयनराजे भोसले

बिचुकले, तुम्ही ‘हिंदी बिग बॉस’मध्ये या, सलमान खानचं आमंत्रण

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.