AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रिपद नाही, पण ‘रिमोट कंट्रोल’, भाजपचा शिवसेनेला नवा पर्याय?

सुकाणू समितीचं अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांना सोपवण्याचा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्रिपद नाही, पण 'रिमोट कंट्रोल', भाजपचा शिवसेनेला नवा पर्याय?
| Updated on: Nov 07, 2019 | 9:44 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या नाही, पण ‘रिमोट कंट्रोल’ सोपवून भाजप शिवसेनेची मनधरणी करणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मुख्यमंत्रिपद नाही, परंतु सुकाणू समितीचं अध्यक्षपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवण्याचा प्रस्ताव भाजपने सेनेसमोर (BJP offer to Shivsena) ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर अडून बसलेली आहे. सत्तास्थापनेचा जादुई आकडा गाठण्यात भाजपला अपयश आलेलं आहे. अपक्षांच्या पाठिंब्यानेही भाजपला खुर्ची मिळवण्याची जादू करणं मुश्किल आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढण्यावाचून कोणताच पर्याय भाजपसमोर दिसत नाही.

मुख्यमंत्रिपदासह सर्व पदं आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप ही शिवसेनेची मागणी कायम आहे. मात्र त्यावर उतारा म्हणून सुकाणू समितीचं अध्यक्षपद टेकवून सेनेची बोळवण करण्याचा भाजपचा इरादा आहे. आता भाजपच्या ऑफरला (BJP offer to Shivsena) शिवसेना कशाप्रकारे प्रतिसाद देते, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

ज्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सत्तेचा रिमोट कंट्रोल होता, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंना सुकाणू समितीचे सर्वाधिकार मिळण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींकडे यूपीएची जी जबाबदारी आहे, त्याला समकक्ष असं सुकाणू समितीचं अध्यक्षपद मानलं जातं. त्यामुळे मुख्यमंत्रिपद नाही, परंतु सुकाणू समितीचं नेतृत्व सोपवण्याचा पर्याय भाजप सेनेला देण्याची चिन्हं आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात ‘मातोश्री’वर सकाळी साडेअकरा वाजता शिवसेनेच्या आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे सर्व आमदारांचं मत आजमावून पाहणार आहेत. बैठकीमध्ये शिवसेना पुढील राजकीय वाटचाल ठरवणार असल्यामुळे फक्त सेनाच नाही, तर भाजपचे डोळेही या बैठकीकडे लागून राहिले आहेत.

दुसरीकडे, साधारण त्याच वेळी चंद्रकात पाटील, सुधीर मुनगंटीवार आणि आशिष शेलार हे भाजपचे ज्येष्ठ नेते राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. भाजप नेत्यांनी सकाळी साडेदहा वाजता राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली होती. मात्र आता ही वेळ बदलून दुपारी दोन वाजताची करण्यात आलेली आहे.

शिवसेना आमदारांच्या बैठकीमुळे भाजपने ‘वेळ’ बदलली?

शिवसेना बैठकीत काय निर्णय घेते, कोणती रणनीती ठरवते, त्यानुसार भाजप पावलं टाकणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भाजपने राज्यपालांच्या भेटीची उशिराची वेळ बदलून घेतल्याचं म्हटलं जातं. या भेटीनंतर सुधीर मुनगंटीवार पत्रकार परिषद घेऊन तपशील सांगणार आहेत.

आमदारांची पंचतारांकित सोय

दरम्यान, बैठकीनंतर शिवसेनेचे सर्व आमदार एकत्रित ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांमध्ये फूट पडू नये यासाठी यासाठी ही पावलं उचलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेदरम्यान अशाचप्रकारे सर्व आमदारांना मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये एकत्रित ठेवण्यात आलं होते. शिवसेना आमदारांचा कोणत्याही इतर पक्षासोबत संपर्क होऊ नये, यासाठी हीच रणनीती शिवसेनेकडून वापरली जात असल्याचं दिसत आहे.

मुनगंटीवार सारखे ‘गोड बातमी’ म्हणतात, कोणी बाळंत होणार आहे का? : सामना

भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने ही पावलं उचल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

BJP offer to Shivsena

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.