AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ठाकरे सरकारवर 24 तासात दुसरा हल्ला

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray) आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत पाहायाला मिळत आहेत.

देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडमध्ये, ठाकरे सरकारवर 24 तासात दुसरा हल्ला
| Updated on: Nov 29, 2019 | 10:36 AM
Share

मुंबई :  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray) आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत पाहायाला मिळत आहेत. कारण शपथविधीनंतर तातडीने ठाकरे सरकारवर हल्ला केल्यानंतर, आता देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray) दुसरा हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी यावेळी पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारवर हल्ला केला. शिवाय बहुमत असताना लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ‬असा प्रश्न फडणवीसांनी विचारला आहे. फडणवीस यांनी 3 ट्विट करुन सरकारवर टीकास्त्र सोडलं.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट

“कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली. मग बहुमताचे दावे कशासाठी? ‬‪या सरकारकडे बहुमत असेल तर लपून-छपून सभागृह बोलावण्याचा निर्णय का? ‬‪नियमबाह्य पद्धतीने प्रो-टेम अध्यक्ष बदलण्याचा प्रयत्न कशासाठी? ‬‪स्वत:च्या आमदारांवर अजूनही इतका अविश्वास का? ‬‪अजूनही त्यांना डांबून ठेवण्याची शिक्षा का?‬ ‪भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? ‪महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!” असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

देवेंद्र फडणवीस यांचा पहिला हल्ला

देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाकरे सरकारवर पहिला हल्ला चढवला होता. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis attack on Uddhav Thackeray)  यांनी आधी अभिनंदनाचं ट्विट केल्यानंतर दुसरं ट्विट थेट टीका करणारं केलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या किमान समान कार्यक्रमावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात वारेमाप घोषणा असल्या तरी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या विकासाच्या वाटचालीत वर्षानुवर्षे मागे राहिलेल्या क्षेत्राचा साधा नामोल्लेख सुद्धा असू नये, हे दुर्दैवी आहे. नवे सरकार त्याकडे लक्ष देईल, अशी आशा करू या”!

पहिल्या कॅबिनेट बैठकीतील निर्णय 

उद्धव ठाकरे यांनी आपल्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत किल्ला संवर्धनाबाबत ठोस निर्णय घेतला. त्यांनी राजगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 606 कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार आहे. या आराखड्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय प्रलंबित होता. हे लक्षात घेऊन उद्धव ठाकरेंनी रायगड किल्ल्याच्या विकास कामांची नस्ती मागवली. तसेच विशेष बाब म्हणून निधी वितरणाच्या प्रस्तावास मान्यता देवून त्यासंदर्भातील नस्तीवर पहिली स्वाक्षरी केली.

संबंधित बातम्या  

देवेंद्र फडणवीस यांचं पहिलं टीकास्त्र, शपथविधीनंतर ठाकरे सरकारवर पहिला हल्लाबोल  

मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच कॅबिनेट बैठकीत उद्धव ठाकरेंकडून ‘हे’ महत्त्वाचे निर्णय 

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.