AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्त्रियांप्रमाणेच पुरूषही आपले शुक्राणू फ्रीज करू शकतात? शुक्राणू किती वर्षे सुरक्षित राहतात? जाणून घ्या…

मनासारखा जोडीदार मिळेपर्यंत पालकत्व पुढे ढकलायचे असेल, तर पुरुषांसाठीही एक वैद्यकीय पर्याय उपलब्ध आहे. शुक्राणू फ्रीज करण्याची प्रक्रिया नेमकी कशी होते, ते किती वर्षे सुरक्षित राहू शकतात आणि भविष्यात त्यांचा वापर कसा केला जातो?

स्त्रियांप्रमाणेच पुरूषही आपले शुक्राणू फ्रीज करू शकतात? शुक्राणू किती वर्षे सुरक्षित राहतात? जाणून घ्या...
sperm freezing processImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 27, 2026 | 4:56 PM
Share

एक बॉलिवूड सिनेमा ज्याचं नाव विकी डोनर होतं, तो प्रचंड गाजला होता. या सिनेमामध्ये आयव्हीएफसाठी पुरुषाचे शुक्राणू कसे साठवले जातात, हे दाखवण्यात आलेलं आहे. आता काही दिवसांपूर्वी अनेक अभिनेत्रींनी त्यांची अंडी गोठवून ठेवल्याची माहिती शेअर केली होती. अलिकडेच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री काजोलची बहीण तनिषा मुखर्जीनेही याबद्दल एका मुलाखतीत माहिती दिली. तिने या निर्णयामागील कारणही सांगितले. या मुलाखतीत काजोलची बहीण तनिषा मुखर्जीने नुकताच आपण बीजांड फ्रीज केल्याचा खुलासा केला. मनासारखा जोडीदार मिळाला नाही, तर आई होणार नाही, असंही तिने सांगितलं. त्यानंतर महिलांप्रमाणे पुरुषांनाही भविष्यात वडील होण्यासाठी शुक्राणू फ्रीज करता येतात का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

आयुष्मान खुरानाच्या ‘विकी डोनर’ चित्रपटातून शुक्राणू दान करण्याची प्रक्रिया अनेकांना माहिती झाली. पण स्वतःचे शुक्राणू भविष्यासाठी जतन करून ठेवता येतात का? याचं उत्तर हो असं आहे.

पुरुष शुक्राणू फ्रीज का करतात?

पुरुषांना करिअर किंवा वैयक्तिक कारणांमुळे उशिरा वडील व्हायचं असू शकतं. काही पुरुष कर्करोगावरील उपचार सुरू करण्यापूर्वी शुक्राणू जतन करतात. केमोथेरपी आणि रेडिएशनमुळे प्रजननक्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे भविष्यात मूल होण्याची शक्यता टिकवण्यासाठी हा पर्याय निवडला जातो.

शुक्राणू फ्रीज कसे करतात?

या प्रक्रियेला ‘स्पर्म बँकिंग’ म्हणतात. सर्वप्रथम पुरुषाच्या शुक्राणूंची तपासणी केली जाते. त्यानंतर प्रयोगशाळेत नमुना गोळा करून त्याची गुणवत्ता तपासली जाते. विशेष द्रावण वापरून शुक्राणू द्रवरूप नायट्रोजनच्या मदतीने अतिशय कमी तापमानात साठवले जातात. या प्रक्रियेला ‘क्रायोप्रिझर्व्हेशन’ म्हणतात.

किती वर्षे शुक्राणू सुरक्षित राहतात?

योग्य पद्धतीने साठवलेले शुक्राणू 20 वर्षांपेक्षाही जास्त काळ जतन करता येऊ शकतात. मात्र, शुक्राणूंची सुरुवातीची गुणवत्ता आणि साठवण प्रक्रिया यावर त्यांची कार्यक्षमता अवलंबून असते.

शुक्राणू फ्रीज केले म्हणजे भविष्यात मूल होण्याची हमी मिळतेच असं नाही. त्यामुळे हा पर्याय निवडण्यापूर्वी प्रजननतज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Follow Us
अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest...
Marathwada MLC Constituency Election 2026 : अमरावती पाठोपाठ मराठवाड्यातही महायुतीचे उमदेवार आघाडीवर, Latest अपडेट काय?
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, ST महामंडळ...
महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय! 391 कोटींचा निधी मंजूर, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची पहिल्यांदाच चौकशी, ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकासमोर...
एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात....
Pradeep Purnekar Case : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाआधीच राम पूर्णेकर ताब्यात; ठाण्यात खळबळ
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या..
राज्यात दुष्काळ मात्र मंत्रालयात पाण्याची टाकी ओव्हरफ्लो! पाण्याच्या नासाडीचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील
Breaking Updates : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात; शिंदे गटातील किरण सरनाईक आघाडीवर
मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका....
Marathwada MLC Election Result 2026 : मराठवाडा पदवीधर मतमोजणीबाबत मोठी अपडेट; 1 लाख 91 हजार मतपत्रिका, गठ्ठे तयार करण्याचं काम अंतिम टप्प्यात
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी...
राहुल गांधींना मोठा धक्का! गर्भवती पत्रकाराला धक्काबुक्की प्रकरणी कोर्टाची थेट कारवाई
84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
Nagpur MLC Election Result : नागपूर पदवीधर मतमोजणी सुरू; 84 टेबलवर 84 हजार मतांची मोजणी, भाजप-काँग्रेसमध्ये चुरस
शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणीवरून भाजप नेत्याचं मोठं विधान
MLC Election 2026 Result Updates : शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमधील मतमोजणी प्रक्रियेवरून भाजप नेत्याचं मोठं विधान, थेट म्हणाले...