राज्यभरात 3 हजार 754 अर्ज दाखल, सर्वाधिक उमेदवार अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांमध्ये 3 हजार 754 उमेदवारांनी 5 हजार 163 उमेदवारी अर्ज दाखल केले (highest number of candidates filed in ashok chavan constituency) आहेत.

highest number of candidates filed in ashok chavan constituency, राज्यभरात 3 हजार 754 अर्ज दाखल, सर्वाधिक उमेदवार अशोक चव्हाणांच्या मतदारसंघात

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघांमध्ये 3 हजार 754 उमेदवारांनी 5 हजार 163 उमेदवारी अर्ज दाखल केले (highest number of candidates filed in ashok chavan constituency) आहेत. आतापर्यंत एकूण 5 हजार 534 उमेदवारांनी 7 हजार 584 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

विशेष म्हणजे सर्वाधिक उमेदवार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ भोकरमध्ये (highest number of candidates filed in ashok chavan constituency) तर सर्वात कमी उमेदवार माहिम आणि शिवडीमध्ये आहेत.

काल (4 ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघात सर्वाधिक 135 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यापाठोपाठ पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात 85 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत. सर्वात कमी उमेदवारी अर्ज मुंबईतील माहिम आणि शिवडी या मतदारसंघांमध्ये दाखल करण्यात आली. या मतदारसंघांमध्ये प्रत्येकी 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले, असं दिलीप शिंदे म्हणाले.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या संपूर्ण कालावधीत अखेर नंदुरबार जिल्ह्यातील 4 मतदारसंघात एकूण 44 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. तर धुळे जिल्ह्यात 5 मतदारसंघात 70 उमेदवार, जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघात 175 उमेदवार, बुलढाणा जिल्ह्यात 7 मतदारसंघात 95 उमेदवार, अकोला जिल्ह्यात 5 मतदारसंघात 107 उमेदवार, वाशिम जिल्ह्यात 3 मतदारसंघात 63 उमेदवार, अमरावती जिल्ह्यात 8 मतदारसंघात 176 उमेदवार, वर्धा जिल्ह्यात 4 मतदारसंघात 64 उमेदवार, नागपूर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 253 उमेदवार, भंडारा जिल्ह्यात 3 मतदारसंघात 70 उमेदवार, गोंदीया जिल्ह्यात 4 मतदारसंघात 76 उमेदवार, गडचिरोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 47 उमेदवार, चंद्रपूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 110 उमेदवार आहेत.

यवतमाळ जिल्ह्यात 7 मतदारसंघात 136 उमेदवार, नांदेड जिल्ह्यात 9 मतदारसंघात 402 उमेदवार, हिंगोली जिल्ह्यात 3 मतदारसंघात 58 उमेदवार, परभणी जिल्ह्यात 4 मतदारसंघात 88 उमेदवार, जालना जिल्ह्यात 5 मतदारसंघात 150 उमेदवार, औरंगाबाद जिल्ह्यात 9 मतदारसंघात 247 उमेदवार, नाशिक जिल्ह्यात 15 मतदारसंघात 243 उमेदवार, पालघर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 80 उमेदवार, ठाणे जिल्ह्यात 18 मतदारसंघात 300 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यात 26 मतदारसंघात 335 उमेदवार, मुंबई शहर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 106 उमेदवार, रायगड जिल्ह्यात 7 मतदारसंघात 132 उमेदवार, पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघात 441 उमेदवार, अहमदनगर जिल्ह्यात 12 मतदारसंघात 203 उमेदवार, बीड जिल्ह्यात 6 मतदारसंघात 232 उमेदवार, लातूर जिल्ह्यात 6 मतदारसंघात 135 उमेदवार, उस्मानाबाद जिल्ह्यात 4 मतदारसंघात 92 उमेदवार, सोलापूर जिल्ह्यात 11 मतदारसंघात 273 उमेदवार, सातारा जिल्ह्यात 8 मतदारसंघात 125 उमेदवार, रत्नागिरी जिल्ह्यात 5 मतदारसंघात 45 उमेदवार, सिंधुदूर्ग जिल्ह्यात 3 मतदारसंघात 32 उमेदवार, कोल्हापूर जिल्ह्यात 10 मतदारसंघात 204 उमेदवार, सांगली जिल्ह्यात 8 मतदारसंघात 125 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *