आमचे भाऊ दोन नंबरवाले, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा

परळीत मतदानयंत्रावर माझा तिसरा नंबर आहे. कारण मी तिसऱ्यांदा निवडून येणार आहे. माझे भाऊ धनंजय मुंडे यांचा नंबर दोनवर आहे. कारण ते दोन नंबरवाले आहेत, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

आमचे भाऊ दोन नंबरवाले, पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर निशाणा
Follow us
| Updated on: Oct 11, 2019 | 8:29 AM

बीड : मतदान यंत्रावर माझे भाऊ धनंजय मुंडे यांचा नंबर दुसरा आहे, कारण ते दोन नंबरवाले आहेत, अशा शब्दात महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी टीका (Pankaja Munde Criticises Dhananjay Munde) केली. बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.

परळी मतदारसंघात मतदानयंत्रावर माझा तिसरा नंबर आहे. त्याचं कारणही तसंच आहे. मी तिसऱ्यांदा निवडून येणार आहे. म्हणून माझा नंबर तिसरा आहे. आणि माझे भाऊ धनंजय मुंडे यांचा नंबर दोनवर आहे. कारण ते दोन नंबरवाले आहेत, अशी टीका पंकजा मुंडे यांनी (Pankaja Munde Criticises Dhananjay Munde) केली.

जयदत्त क्षीरसागर यांचा मतदान यंत्रावर पहिला नंबर येतो. कारण ते आमच्यासाठी ज्येष्ठ नेते आहेत. कोणीही त्यांच्यासमोर आलं, तरी त्यांना जयदत्त अण्णांच्याच पाया पडावं लागेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

मी तिसऱ्यांदा निवडून येऊन विजयाची हॅट्ट्रिक करणार आहे. तुमची कितवी वेळ आहे? असा प्रश्न जयदत्त क्षीरसागर यांना पंकजांनी केला. त्यावर ‘डबल हॅट्ट्रिक’ असं उपस्थितांमधून उत्तर येताच, म्हणजे तुमच्या पहिल्या निवडणुकीवेळी मी नव्हतेच की काय! असं म्हणत पंकजा मुंडेंनी खसखस पिकवली.

घरात सगळं आलबेल आहे, हे सांगावं लागतं, म्हणजेच पवार कुटुंबात गडबड आहे : सुरेश धस

पहिली निवडणूक किती साली झाली? म्हणजे तेव्हा मी एक वर्षांची असेन. आले असेन तेव्हा. तेव्हा विरोधात असेन. राजकारण करताना मला माझ्या वडिलांनी दोन गोष्टी शिकवल्या. राजकारणात कधीच कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. आणि राजकारण नेहमी बेरजेचं करायचं. तसंच स्वतः जिथे उभे आहात, त्याबद्दल असुरक्षितता बाळगण्याचं काही कारण नाही, हेही शिकवलं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसे नेते एकमेकांवर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत. शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रचारादरम्यान रायमोहा येथे सभेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाषण करताना पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंवर (Pankaja Munde Criticises Dhananjay Munde) टीका करण्याची संधी सोडली नाही. परळी मतदारसंघातून ही चुलत भावंडं एकमेकांसमोर आहेत.

याच सभेत भाजपचे विधानपरिषदेवरील आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला होता. ‘आमच्या घरात सगळं काही आलबेल आहे, असं सांगायची वेळ का येते? याचा अर्थ शरद पवार यांच्या कुटुंबात काहीतरी गडबड आहे’ अशा शब्दात धस यांनी पवारांवर निशाणा साधला.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.