राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पत्ता कट

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रुपाली चाकणकर या खडकवासलामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, मात्र या ठिकाणी नगरसेवक सचिन दोडके यांना राष्ट्रवादीने खडकवासलातून उमेदवारी जाहीर केली

राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा पत्ता कट

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचाच पत्ता कट (Rupali Chakankar denied Candidature) झाला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे रुपाली चाकणकर पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या रुपाली चाकणकर या खडकवासलामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या, मात्र या ठिकाणी नगरसेवक सचिन दोडके यांना राष्ट्रवादीने खडकवासलातून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे चाकणकरांचा हिरमोड झाल्याची माहिती आहे.

खडकवासला मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना तिकीट दिलं आहे. तापकीरांना पराभवाची धूळ चारण्याची चाकणकरांची इच्छा होती, मात्र ती अपुरीच राहिल्याचं दिसतं.

खरं तर, खडकवासला हा बारामती लोकसभा मतदारसंघात असलेला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. परंतु खडकवासल्यात राष्ट्रवादीचा मार्ग खडतर असल्याचं म्हटलं जातं. या मतदारसंघात आता भाजप विजयी हॅटट्रिक साधण्यासाठी सज्ज झाला आहे.

सुप्रिया सुळेंची दोन वेळा साथ सोडणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा ‘सरप्राईज’ उमेदवार?

भाजपचा आमदार असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी आपला झेंडा रोवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. पण, भाजपचे दोन वेळा आमदार असलेल्या भीमराव तापकीर यांचं आव्हान (Rupali Chakankar denied Candidature) मोडून काढणं, राष्ट्रवादीसाठी कठीण आहे.

खडकवासला मतदारसंघ

खडकवासला मतदारसंघात झपाट्याने शहरीकरण झालं आहे. पुणे महापालिका हद्दीतील काही गावे आणि खडकवासलातील ग्रामीण भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला. 15 वर्षात झपाट्याने शहरीकरण झाल्याने भाजपचा मतदार या ठिकाणी मोठा आहे. भीमराव तापकीर हे भाजपचे विद्यमान आमदार असले तरी भाजपच्या इच्छुकांची संख्या देखील डझनभर आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांपैकी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके आणि रुपाली चाकणकर यांची नावं आघाडीवर होती.

सध्या खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद दिवसेंदिवस कमी होत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा प्रत्यय आला. त्यामुळेच की काय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने विशेष लक्ष दिलं. पण, यंदाही लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कांचन कुल यांना खडकवासलामधून जास्त मतं मिळाली. त्यामुळे बारामतीकरांची
दोन वेळा साथ सोडणाऱ्या मतदारसंघात राष्ट्रवादी काय चमत्कार करणार त्याकडे लक्ष लागलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *