पुरावे देतो, फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा, खोटे निघाल्यास माघार, संदीप क्षीरसागर यांचा हल्लाबोल

बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर (Jaydutta Kshirsagar vs Sandeep Kshirsagar Beed) यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

पुरावे देतो, फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा, खोटे निघाल्यास माघार, संदीप क्षीरसागर यांचा हल्लाबोल

बीड : बीड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर (Jaydutta Kshirsagar vs Sandeep Kshirsagar Beed) यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मतदार संघात मोठी रॅली काढून संदीप क्षीरसागर (Jaydutta Kshirsagar vs Sandeep Kshirsagar Beed) यांनी शक्तिप्रदर्शन करत निवडणुकीस तयार असल्याचं दाखवून दिलं. बीडमध्ये त्यांचा मुकाबला काका आणि शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात होत आहे.

संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांच्यावर पहिल्याच दिवशी तुफान हल्ला चढवला.

निवडणुकीसाठी मी तयार असून, माझ्या चारित्र्यावर बोलण्याआधी त्यांनी पुरावा दाखवावा. मात्र त्यांच्या चारित्र्यावरील ऑथेंटिक-अस्सल पुरावा मी देतो. तो पुरावा फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवा, तो जर खोटा निघाला तर निवडणुकीतून माघार घेण्याची तयारी आहे, असं संदीप क्षीरसागर म्हणाले.

बीड जिल्ह्यातील काका-पुतण्याचा हा वाद राज्यभर पोहोचला आहे. संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीकडून मैदानात आहेत.

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत स्थिरावलेले फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात पुतण्या संदीपने शड्डू टोकला आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री जयदत्त क्षीरसागर तर भाजपकडून आमदार विनायक मेटे यांच्यात थेट लढत झाली होती. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीड शहरात विनायक मेटे यांच्यासह जिल्ह्यातील भाजप उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतली होती. मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी मोदी लाटेचा सामना करत आ. विनायक मेटे यांना पाच हजारपेक्षा अधिक मतांनी पराभूत केले होते. आता यंदा जयदत्त क्षीरसागर आपला विजयी वारु कायम राखतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *