बाळासाहेबांनी ‘तोडफोड सेना’ उल्लेख केलेले तेजस ठाकरे राजकीय मैदानात?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे ही वडील आणि भावासोबत निवडणुकांच्या (Tejas Thackeray Information) रणधुमाळीत दिसून येत  आहेत.

बाळासाहेबांनी 'तोडफोड सेना' उल्लेख केलेले तेजस ठाकरे राजकीय मैदानात?
Follow us
| Updated on: Oct 10, 2019 | 10:10 AM

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे ही वडील आणि भावासोबत निवडणुकांच्या (Tejas Thackeray Information) रणधुमाळीत दिसून येत  आहेत. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर तेजसही प्रचारात सक्रिय (Tejas Thackeray Information) झाल्याचे चित्र आहे. यामुळे येत्या काळात युवासेनेची सूत्र तेजस ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे महायुतीची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत उद्धव ठाकरेंसोबत मंचावर तेजस ठाकरेही (Tejas Thackeray In politics) उपस्थित होते. गेल्या काही दिवसात तेजस ठाकरे यांच्या राजकारणात सक्रीय (Tejas Thackeray Information) होण्यावरुन अनेक चर्चा सुरु आहेत. मात्र याबाबत स्पष्टीकरण देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “तेजस हा जंगलात रमणारा माणूस आहे. तो इकडे माणसांच्या जंगलात रमणार नाही. सभा कशी असते, ते पाहण्यासाठी तो आला आहे.”

तेजस ठाकरे यांचा अल्पपरिचय (Tejas Thackeray Information)

तेजस ठाकरे यांचे शालेय शिक्षण माहीममधील बॉम्बे स्कॉटिश शाळेत झाले आहे. तर त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील जय हिंद कॉलेजमध्ये झाले आहे. सध्या तेजस ठाकरेंचे वय 23 वर्ष आहे. ते काही वर्ष शिक्षणासाठी परदेशात होते. वन्यजीव म्हणजे वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

तेजस ठाकरे हे आंतरराष्ट्रीय स्तरावर वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या संस्थांशी जोडले आहेत. तेजस ठाकरे यांनी वन्य जीवांचा अभ्यास करताना खेकड्यांच्या अन्य प्रजाती शोधून काढल्या आहेत. यातील एका प्रजातीला त्यांनी ठाकरे कुटुंबियांचे नाव दिलं आहे. गॅटीएना पत्रोपर्पर्रीया, गॅटीएना स्पेंडीटा, गुबरमॅतोरिएना एग्लोकी, गुबरमॅतोरिएना वॅगी आणि भगव्या रंगाचा गुबरमॅतोरिएना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत. यातील शेवटचं नाव हे ठाकरे या आडनावावरुन देण्यात आलं आहे.

तेजस ठाकरेंनी खेकड्यांच्या या प्रजातींचे संशोधन फेब्रुवारी 2016 ला केलं होतं. वन्य जीवांवर संशोधनात्मक माहिती देणाऱ्या झुटास्का या लॅटिन साप्ताहिकाने तेजस यांनी शोधलेल्या खेकड्यांच्या जातीला नावं दिली होती.

तेजसने लांभ जांभळट कवच आणि केशरी रंगाची नांगी असलेल्या खेकड्यांच्या प्रजाती शोधल्या आहेत. कोकणातल्या रघुवीर घाटात या खेकड्यांच्या जातीचा शोध लागला. तसेच त्याने अनेक दुर्मिळ अशा सापांच्या प्रजातीही शोधल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्याकडे साप आणि सरडे आहेत.

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते आदित्य ठाकरे यांचा राजकीय प्रवेश झाला होता. जवळपास 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 17 ऑक्टोबर 2010 मध्ये युवासेनेच्या स्थापनेदरम्यान आदित्य ठाकरेंची राजकीय कारकीर्द सुरु झाली.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या लाँचिगदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांनी तेजसचे कौतुक केलं होतं. “तेजसची तोडफोड सेना आहे, त्याची स्टाईल माझ्यासारखी, छंद माझ्याशी जुळते, वन्यजीवन त्याला आवडते,” असे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. तेजस ठाकरे हे घरात आक्रमक असल्याने त्यांना बाळासाहेब ठाकरे ‘तोडफोड सेना’ म्हणाले होते.

उद्धव ठाकरे सध्या त्याचं ब्रॅण्डिंग आणि पॉलिटिकल ली ग्रुमिंग करत आहेत. ते पाहता भविष्यात युवासेनेची सूत्र तेजस ठाकरेंकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेजस ठाकरे हे अत्यंत Down to earth असले, तरी तो तितकाच आक्रमक आहे. विशेष म्हणजे तेजस हा मितभाषी आहे. पण त्याची शैली ही आक्रमक आहे.

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....