मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काहीही शंका नाही : देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी अनौपचारिक गप्पादरम्यान, अनेक औपचारिक बाबी पत्रकारांसोबत शेअर केल्या.

मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहील याबाबत काहीही शंका नाही : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Oct 29, 2019 | 2:19 PM

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी अनौपचारिक गप्पादरम्यान, अनेक औपचारिक बाबी पत्रकारांसोबत शेअर केल्या. सत्तास्थापनेचा मुहूर्त, सत्तेचं गणित, शिवसेनेसोबत ठरलेले वादे, मुख्यमंत्री कोण याबाबतची माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis informal chat) यांनी दिली. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पा मारल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, “पुढील 5 वर्ष आमचं सरकार स्थिर राहील.  कोणी काही बोललं तरी चिंता करण्याचं कारण नाही. मी मिळालेल्या जागांवर खुश आहे. आम्ही फर्स्ट मेरिटमध्ये येणार होतो पण आम्ही फर्स्ट क्लासमध्ये आम्ही आलो”

मी 5 वर्ष मुख्यमंत्री राहिल याबाबत काही शंका नाही. आमचा ए प्लॅन आहे त्यामुळे बी प्लॅनची गरज नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.  शपथविधी मुहूर्त ठरला नाही. पुढच्या आठवड्यात शपथविधी असू शकतो. सत्ता स्थापनेबाबत माध्यमांना सरप्राईज देणार, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पावसात भिजावं लागतं हा आमचा अनुभव कमी पडला, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांच्या भाषणावर तिरकस भाष्य केलं.  भाजप अध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत येणार नाहीत. अनधिकृत आणि अधिकृत सेना -भाजप बैठक सुरु आहेत, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद ठरलंच नाही

1995 चा फॉर्म्युला वगैरे काहीही ठरलेले नाही. शिवसेनेने अजून काहीही मागणी केलेली नाही. अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद असे आश्वासन सेनेला कधीही दिलेले नाही, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी गौप्यस्फोट केला.

शिवसेनेला पाचही वर्षाचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटू शकतं, पण वाटू शकणे आणि होणे यात फरक आहे, असा टोमणा मुख्यमंत्र्यांनी लगावला.

सत्तास्थापनेचं गणित

भाजपने 105 जागांसह (Independent MLA Shankarrao Gadakh support  Shiv Sena) सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. मात्र कोणत्याही एका पक्षाला 145 हा सत्तास्थापनेच्या आकडा गाठता आलेलं नाही. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या, राष्ट्रवादी 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 जागांसह चौथ्या स्थानावर आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अनौपचारिक गप्पांमधील मुद्दे

  • निवडणुका चांगल्या पार पडल्या, महायुतीला चांगला प्रतिसाद मिळाला
  • आम्ही लवकरच सरकार स्थापन करु, काहीही बातम्या आल्या तरी सरकार आमचंच असेल
  • उद्या बैठक आहे त्यात नेता कोण हे स्पष्ट होईल. पंतप्रधानांनी स्पष्ट केलंच आहे
  • आम्ही फर्स्ट क्लासमध्ये आलो आहे, पण आमच्या मेरिटबद्दल कोणच बोलत नाहीत.
  • शपथविधीचा मुहूर्त लवकरच कळेल.
  • आतमध्ये काय आहे हे तुम्हाला माहीत नाही. लवकरच फॉर्म्युला कळेल
  • A प्लॅन आहे, B प्लॅनची गरज नाही
  • पावसात भिजावं लागतं हा आमचा अनुभव कमी पडला
  • ज्या शेतकऱ्याने भाजपचा ड्रेस घालून आत्महत्या केली त्याच्या नावावर एकही एकर शेती नाही
  • त्याच्या पत्नीने सांगितलं आहे की आमच्या घरगुती भांडणामुळे केली
  • अमित शाह उद्या येणार नाहीत.
  • अधिकृत आणि अनधिकृत आमच्या बैठका सुरू आहेत
  • अडीच वर्षाचा मुख्यमंत्री असा कुठलाही वादा केला नव्हता
  • त्यांना पाचही वर्षाचा मुख्यंमंत्री पाहिजे असं वाटू शकतं
  • वाटू शकणे आणि होणं यात फरक आहे
Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.