बोगस खते, बियाणे विकणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई होणार, अधिकारी लागले कामाला…
येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सून पाऊस सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर बोगस खते आणि बियाणे विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई होणार आहे.

भंडारा : महाराष्ट्रात (maharashtra) सगळे शेतकरी मान्सूनची (mansoon update) वाट पाहत आहेत. मागच्या कित्येक दिवसांपासून संपूर्ण मशागत झाल्यापासून बियाणे आणि खते खरेदी करीत आहेत. परंतु यावर्षी बोगस खते (bogus seeds) आणि बियाणे अधिक सापडल्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या चिंतेत आहे. ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली आहे, ते सुध्दा चिंतेत आहेत. कारण यावर्षी गुजरात आणि इतर राज्यातून बोगस बियाणे महाराष्ट्रात अधिक दाखल झाले आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बियाणांचा साठा सुध्दा सापडला आहे. कृषी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत जितके बोगस बियाणे सापडले आहे, कृषी केंद्र चालकांवरती कारवाई केली आहे. यापुढे असा कुठेही प्रकार आढळून आल्यास संबंधित व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचं कृषी विभागानं स्पष्ट केलं आहे.
कृषी केंद्र चालकांवर फौजदारी कारवाई होणार
येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बी-बियाणे मिळावे यासाठी कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. बोगस खते, बी-बियाणे विक्रेत्यांवर विभागाची करडी नजर आहे. आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई सुद्धा केली आहे. असा प्रकार आढळल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने जाहीर केले आहेत. भरारी पथकामार्फत खते, बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यांची कसून तपासणी करण्यात येऊन विनापरवाना विक्री, बियाणे, खते व कीटकनाशके यांची जादा दराने विक्री केलास किंवा काळाबाजार केल्यास कारवाईची निर्देश देण्यात आले आहेत.
भंडारा जिल्ह्यात आठ भरारी पथकांची स्थापना
विशेष म्हणजे भंडारा जिल्ह्यात आठ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विक्री, भेसळयुक्त खते याबाबत शोधमोहीम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. काही बोगस कंपन्यांचे खासगी एजंट गावागावात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन बियाणे खते व कीटकनाशके स्वस्तात मिळवून देतो, असे आमिष देतात, शेतकऱ्यांना बिले देत नाहीत, अशावेळी शेतकऱ्यांची फसवणूक होते. सगळी गुप्त माहिती पथक शोधत आहे. जिथं बोगस बियाणे सापडतील किंवा तक्रार आल्यानंतर तिथं कारवाई करण्यात येणार आहे.
येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात काही ठिकाणी मान्सून पाऊस सक्रीय होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
