पावसानंतर आता करप्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हतबल

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील उत्पादनात तर घट होणारच आहे. पावसाचे सावट दूर होत असतानाच आता खरिपाच्या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यातील रेणापूर परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी हवालदिल झाला आहे.

पावसानंतर आता करप्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हतबल
Follow us
| Updated on: Sep 11, 2021 | 4:12 PM

लातुर : मध्यंतरी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. खरिपातील उत्पादनात तर घट होणारच आहे. पावसाचे सावट दूर होत असतानाच आता खरिपाच्या पिकावर करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यातील रेणापूर परिसरात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. हंगामाच्या सुरवातीपासूनच खरिप पिक जोपसताना शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागत आहे. गतवर्षी खरिप पिकांचे नुकसान होऊल देखील यंदा सोयाबीनच्या पिकावर शेतकऱ्यांनी भर दिला होता. लातुरची बाजारपेठ आणि नगदी पिक म्हणून शेतकरी सोयाबीनला प्राधान्य देत आहे. मध्यंतरी पावसामुळे पिकाचे तर नुकसान झाले आहेच परंतु, आता ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

हवामानातील आर्द्रता वाढत असून बुरशी वाढीस वातावरण तयार झाल्याने सोयाबानची पाने ही पिवळी पडत आहेत. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरवर्षी या परिसरात केवळ सोयाबीनचेच उत्पादन घेतले जाते. त्यामुळे पिकाची फेरपालट ही गरजेची आहे. मात्र, उत्पादनापोटी शेतकरी हे सोयाबीनलाच पसंती देत आहेत. खरिप हंगामाच्या सुरवातीला पावसाने ओढ दिली होती. यानंतर किडीची प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांनी फवारणीची कामे करावी लागली होती. आता सोयाबीन बहरात असतानाच मुसळधार पाऊस आणि आता पावसाने उघडीप दिली तर किडीचा प्रादुर्भाव. त्यामुळे खरिपात शेतकऱ्यांच्या पदरी नेमके काय पडणार हे पहावे लागणार आहे.

पिक पध्दतीत बदल गरजेचा

लातुर जिल्ह्यात खरिप हंगामात सोयाबीन हेच मुख्य पिक आहे. दरवर्षी रब्बीच्या सरासरीच्या क्षेत्रात घट होत आहे तर खरिपातील सोयाबीन वाढत आहे. शेतकऱ्यांनी पिकांची फेरपालट करुन आर्द्रता कमी करण्यासाठी बीबीएफ पध्दतीने पेरणी करणे आवश्यक आहे. पेरणीपुर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया व पेरणीनंतर दीड महिन्याने बुरशी नाशकाची फवारणी करणे आवश्यक असल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम यांनी सांगितले आहे.

कृषी अधिकारी थेट बांधावर

पावसाने उघडीप दिल्यानंतर पिक पाहणीसाठी कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. शुक्रवारी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कदम, मंडळ कृषी अधिकारी प्रमिला जंजिरे, अंगद सुडे यांनी रेणापूर तालुक्यातील पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.

असे करा पिकाचे व्यवस्थापन

करप्या रोगाच्या व्यवस्थापनासाठी टेब्युकोन्याझोल आणि सल्फर 20 ग्रम प्रती 10 लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणे आवश्यक आहे. शिवाय गरजेनुसार 10-20 मिली स्टिकचा वापर केल्याने किडीचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे कदम यांनी सांगितले. After rain, now the outbreak of karpaya disease, farmers in trouble

इतर बातम्या :

Video | नवरी, नवरदेवासमोर तरुणाचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

साकीनाका बलात्काराची नेमकी घटना काय, तपास कुठपर्यंत पोहोचला? मुंबईच्या आयुक्तांकडून सविस्तर माहिती

Vijay Rupani Resign : गुजरातचा पुढचा मुख्यमंत्री कोण? विजय रुपाणींच्या राजीनाम्याचं नेमकं कारण काय?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.