AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : निसर्गावर आधारित शेती हाच पर्याय, पंजाबराव डख यांनी उलगडले हवामान अंदाजाचे गुपित!

आहे शेती म्हणून करण्यात अर्थ नाही. तर पीक पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतचा अभ्यास करुनच उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे. काळाच्या ओघात तरुण शेतकरी आशा गोष्टी आत्मसात करीत आहेत पण यामध्ये अधिक वाढ होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कमर्शियल होणे गरजेचे आहे.

Beed : निसर्गावर आधारित शेती हाच पर्याय, पंजाबराव डख यांनी उलगडले हवामान अंदाजाचे गुपित!
हवामान तज्ञ, पंजाबराव डख
| Updated on: Apr 27, 2022 | 3:15 PM
Share

बीड : काळाच्या ओघात (Farming System) शेतीचे स्वरुप हे बदलत आहे. यंदाच्या खरीप आणि रबी हंगामात याचा प्रत्यय (Maharashtra) राज्यातील शेतकऱ्यांना आलाच आहे. त्यामुळे आता निसर्गावर आधारित शेती हाच एकमेव पर्याय असल्याचे (Weather expert) हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले आहे. उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला आहे पण निसर्गाचा अडथळा होत असल्याने आर्थिक तर नुकसान होतच आहे पण शेतकऱ्यांचा उद्देशही साध्य होत नाही. भारतामध्ये पर्जन्यमानात अनिश्चितेचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती न करता त्याचा अंदाज पाहूनच शेतीमध्ये बदल केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा सल्ला त्यांनी जिल्ह्यातील केज येथे आयोजित व्याख्यानमालेत दिला आहे.

सोशल मिडियामुळेच शेतकऱ्यांपर्यंत पोहचलो

सन 1996 ते 2001 या पाच वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली होती. वृक्षतोडीचा परिणाम आणि हवामान अंदाज सांगण्यास सुरवात केल्याचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले. मात्र, त्या दरम्यान प्रभावी यंत्रणा नसल्याने थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचता आले नाही. पण 2015 अॅंन्ड्राईड मोबाईलमुळे हे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांना हवामान अंदाजाचा फायदा व्हावा म्हणून 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे व्हॅटस्अप ग्रुप बनविण्यात आले आहेत. एका ग्रुपमध्ये 700 शेतकरी याप्रमाणे नोंदणी केली आहे. त्यामुळे एक संदेश हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहेत. तर आतापर्यंत 14 हजार गावांना भेटी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतीमध्ये योग्य नियोजनच महत्वाचे

आहे शेती म्हणून करण्यात अर्थ नाही. तर पीक पध्दतीपासून ते बाजारपेठेपर्यंतचा अभ्यास करुनच उचललेले पाऊल महत्वाचे ठरणार आहे. काळाच्या ओघात तरुण शेतकरी आशा गोष्टी आत्मसात करीत आहेत पण यामध्ये अधिक वाढ होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी कमर्शियल होणे गरजेचे आहे. तर शेती व्यवसयातून फायदा होणार आहे. व्यवसायात अत्याधुनिक यंत्राचा वापर वाढत आहे पण त्याच बरोबरीने उत्पादन वाढणेही गरजेचे आहे.

शेतकऱ्यांनीही पर्यावरणाचे ज्ञान मिळवावे

हवामानबाबत जागृती होत आहे. 1920 ते 2022 या कालखंडात 132 वेळा आवर्षणाची परस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हवामान आणि पर्जन्यमानाच्या आधारित शेती करण्याचे कसब शेतकऱ्यांनीच आत्मसात केले तरच नुकसान टळणार आहे. शेतीचा आराखडा तयार करुनच शेती केल्यास नुकसान टळणार आहे तर उत्पादनामध्येही वाढ होणार आहे. पर्यावरण हा खूप मोठा विषय असला तरी शेतीच्या अनुशंगाने महत्वाचे असणारे ज्ञान आत्मसात करण्याचा सल्ला सेवानिवृत्त अभियंता हनुमंत देशमुख यांनी दिला.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.